Tunisha Sharma suicide esakal
मनोरंजन

Tunisha Sharma : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची सेटवरच आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

निषमुंबईः अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये मुख्य भूमिका निभावलेली टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

तुनिषा शर्माचं नायगाव येथे शूटिंग सुरु होतं. मालिकेच्या सेटवरील वॉश रुममध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. आतमध्ये गेलेली तुनिषा खूप वेळ बाहेर येत नसल्याने सहकाऱ्यांनी आतमध्ये प्रवेश केला तर ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

हेही वाचाः Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

सेटवरील सहकाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तुनिषाचं वय २० वर्षे होतं. तिने आत्महत्या का केली? याचं कारण समजू शकलेलं नाही. मालिकेचं शूटिंग सुरु असतांना सेटवरच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

तुनिषाला लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. 4 जानेवारी 2002 रोजी चंदीगडमध्ये तिचा जन्म झाला. झाला. अवघ्या 14 व्या वर्षी तिची 'भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप' या मालिकेसाठी निवड झाली होती.

'भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप' या मालिकेत  तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती. त्याच वर्षी तिने चक्रवर्ती अशोक सम्राट या टीव्ही मालिकेत राजकुमारी अहंकाराची भूमिकाही साकारली होती. त्यानंतर तिने गब्बर पुंचवाला आणि शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंग या चित्रपटात भूमिका केल्या. तुनिषाच्या अचानक एक्झिटने हळहळ व्यक्त केली जातेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT