ali merchant wedding with ᴀɴᴅʟᴇᴇʙ ᴢᴀɪᴅɪ photos and video viral  SAKAL
मनोरंजन

Ali Merchant: वयाच्या ३८ व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला अभिनेता, लग्नसोहळ्याचे फोटो - व्हिडीओ व्हायरल

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता अली मर्चंट तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकलाय

Devendra Jadhav

Ali Merchant Wedding News: टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अली मर्चंट. अली मर्चंट तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकलाय. नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत रितीरिवाजांनुसार अलीने २ नोव्हेंबरला अंदलीब जैदीशी लग्न केलेय.

अलीने लॉक अप आणि बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. अलीच्या लग्नाबद्दल त्याचे फॅन्स कमेंटमध्ये त्याचं अभिनंदन करत आहेत.

(ali merchant wedding with ᴀɴᴅʟᴇᴇʙ ᴢᴀɪᴅɪ photos and video viral)

टीव्ही अभिनेता-संगीतकार अली मर्चंटने गुरुवारी लखनऊमध्ये हैदराबादची मॉडेल अंदलीब जैदीशी लग्न केले.

38 वर्षीय अली मर्चंटने 2 नोव्हेंबर 2023 रोजी लखनऊमध्ये अंदलिब जैदीशी लग्न केले. या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो समोर आले आहेत.

अली मर्चंटचं हे तिसरं लग्न. याआधीने त्याने सारा खानसोबत लग्न केलं होतं. परंतु दोन महिन्यांत त्यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर अलीचे दुसरे लग्न अनम मर्चंटसोबत झाले आणि 5 वर्षानंतर तो तिच्यापासून वेगळा झाला. आता अलीने अंदलीबसोबत तिसरं लग्न केलंय. (Latest Marathi News)

अलीची पत्नी अंदलीब जैदी ही व्यवयायाने मॉडेल. एका फॅशन शोदरम्यान दोघांची भेट झाली होती. पुढे रिंग घालुन अलीने तिला लग्नाची मागणी घातली होती. आणि अखेर दोघे लग्नबंधनात अडकले.

या दोघांच्या लग्नाला फक्त त्याचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. अली मर्चंट आता 15 नोव्हेंबरला मुंबईत आपल्या लग्नाचे रिसेप्शन देणार आहे. (Latest Entertainment News)

अलीने इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत लिहिले की, "आता आपल्या दोघांना आयुष्यभर एकमेकांचा सहवास मिळेल."

अलीला आपण लिबास या वेब शोमध्ये अभिनय करताना पाहिलंय काम. याशिवाय विक्रम बेताल की रहस्य गाथा, बंदिनी, आहट आणि शपथ यांसारख्या टीव्ही शोमध्ये अली झळकलाय. गेली ५ वर्ष अली अभिनय क्षेत्रापासुन दूरच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT