Alia Bhatt
Alia Bhatt Sakal
मनोरंजन

पिक्चर फ्लॉप झाल्यास कलाकारांचं मानधन...; आलिया भट 'लाईमलाईट'मध्ये

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिचे नवे चित्रपट, गरोदरपण आणि आता तिची काही मतं. एका मुलाखतीत तिने मांडलेल्या मतांची सध्या जोरदार चर्चा होतेय. स्टार्सला मिळणारा मोबदला, त्यांचा पगार याविषयी तिने भाष्य केलंय.

एखादा पिक्चर फ्लॉप झाला, तर त्यातला कलाकारांना किती मोबदला मिळतो असा प्रश्न आलियाला एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर तिने सांगितलं की, चित्रपटाच्या बजेटच्या हिशोबाने कलाकारांचा मोबदला असायला हवा. पण कोणी किती पैसे घ्यावेत हे मी सांगणारी कोण? मी तर अजून खूप लहान आहे.

आलिया पुढे म्हणाली की, अनेक कलाकार असेही आहेत की पिक्चर जर फ्लॉप झाला तर ते आपलं मानधन घेत नाहीत, किंवा मिळालेलं मानधन परत करतात. मला विचाराल तर या सगळ्यावर नीट विचार व्हायला हवा. निर्माते आणि कलाकारांनी सुद्धा या अँगलने विचार करायला हवा.

आलिया भटचा डार्लिंग्ज हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर येतोय. या चित्रपटाच्या माध्यमातून ती निर्माती म्हणून डेब्यू करतेय. आलियाचं प्रॉडक्शन हाऊस इटर्नल सनशाईन आणि शाहरुख खानचं प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट या दोघांची निर्मिती असलेला डार्लिंग्ज चित्रपट ५ ऑगस्टला रिलीज होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : ‘पीओके’ भारताचेच, आम्ही ते घेऊ ;अमित शहा

आजचे राशिभविष्य - 17 मे 2024

Latest Marathi News Live Update : महायुतीची शिवाजी पार्कवर तर, इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर आज सांगता सभा

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

SCROLL FOR NEXT