Alia Bhatt bollywood actress mimicry artist social media  esakal
मनोरंजन

Viral News : 'कोण आहे गरिबांची आलिया भट्ट?' गेल्या दहा वर्षांपासून तिनं...

त्या कॉमेडियन सेलिब्रेटीला गरीबांची आलिया भट्ट असे म्हटले जाते. ती एक सोशल मीडिया इंफ्ल्युअर्स आहे.

सकाळ डिजिटल टीम

Alia Bhatt bollywood actress mimicry artist social media : बॉलीवूडमध्ये मोठमोठ्या सेलिब्रेटींची मीमिक्री करणारे आर्टिस्ट काही कमी नाहीत. अशा मीमिक्री आर्टिस्टनं मोठ्या संघर्षानं आपली ओळख निर्माण करत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. यासगळ्यात सध्या प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टची नक्कल करणाऱ्या सेलिब्रेटी कलाकाराची चर्चा होताना दिसते आहे.

त्या कॉमेडियन सेलिब्रेटीला गरीबांची आलिया भट्ट असे म्हटले जाते. ती एक सोशल मीडिया इंफ्ल्युअर्स आहे. तिला सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. तिच्या व्हायरल झालेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्याला नेहमीच आलिया भट्टच्या नावावरुन चिडवण्यात आले. काहींनी तर गरीबांची आलिया भट्ट असेही नामकरण केले. त्यामुळे मला वाईट वाटले नाही त्यातून प्रेरणाच मिळाली. असे तिचे म्हणणे आहे.

Also Read - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

ज्या सेलिब्रेटीला गरीबांची आलिया भट्ट असे म्हटले जाते तिचे नाव चांदणी असे आहे. जेव्हा रणबीर-आलियाचे लग्न सुरु होते तेव्हा चांदणी ही चर्चेत आली होती. तिनं आलियाची मीमिक्री करुन सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली होती ती बराचकाळ ट्रेडिंगही होती. तिच्या त्या व्हिडिओची दखल आलिया आणि करण जोहरला देखील घ्यावी लागली होती.

एका मुलाखतीमध्ये चांदणीनं सांगितलं की, मी आलियाची मोठी चाहती आहे. कित्येक तास मी तिचे निरीक्षण करत असते. ती कशी बोलते, बोलताना कुठे थांबते, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत या साऱ्या गोष्टींना मी खूप दिवसांपासून महत्व देते आहे. माझ्या मीमिक्रीला जो प्रतिसाद मिळतो आहे त्यामागे बरीच मेहनत आहे. आलियासारखा आवाज येण्यासाठी मला तब्बल दहा वर्षांची मेहनत घ्यावी लागली आहे.

लोकं मला काय बोलतात त्याचा मी फारसा विचार करत नाही. लोकांना काय आपण काहीही केलं तरी त्याचं कौतूक नसतं तर त्यांना फक्त टीका कशी करायची एवढचं माहिती असतं. मी अजुनही माझ्या आवाजावर जास्त मेहनत घेते आहे. व्हाईस मॉड्युलेशनवर काम करते आहे. लोकं मला गरीबांची आलिया भट्ट म्हणतात तेव्हा त्यांना त्यामागे माझे कष्ट काय आहे हे माहिती नसतं.

आलियाचे मीमिक्री व्हिडिओ तयार करणारी चांदणीनं कायद्याची पदवी घेतली आहे. तिला मास कम्युनिकेशन मध्ये रस होता. कुटूंबातील काही गोष्टींमुळे कायद्याचा अभ्यास करावा लागला. असेही चांदणीनं यावेळी सांगितले. मी जेव्हा आलियाच्या पिझ्झावाल्या जाहिरातीवर व्हिडिओ बनवला होता तो तिलाही खूप आवडला होता. तिच्या प्रतिक्रियेनं मला खूप आनंदही झाला होता. असंही चांदणीनं यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT