aaliya 
मनोरंजन

पत्रकाराच्या 'या' प्रश्नावर भडकली आलिया, म्हणाली पुन्हा असे प्रश्न विचारु नको..

सकाळवृत्तसेवा

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री आलिया सध्या या दिवसात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर रणबीर कपूर आणि त्याच्या कुटुंबाला आधार देत आहे. नीतू कपूर यांची ती वेळोवेळी काळजी घेतेय. आलिया तिच्या गोड स्वभावामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. तिच्यातील निरागसपणा अनेकांना भावतो. मात्र तिच्या चाहत्यांनी तिचा राग क्वचितंच पाहिला असेल. अशातंच सध्या सोशल मिडियावर तिचा एका व्हिडिओ व्हायरस होतोय ज्यात ती भडकलेली दिसून येतेय.

हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये आलिया खूप रागावलेली दिसून येतेय. इतकंच नाही तर ती पत्रकाराला चांगलीच ओरडत आहे. हा व्हिडिओ होळीच्या दरम्यानचा आहे. एका कार्यक्रमात तीने हजेरी लावली होती त्यावेळी मिडियला मुलाखत देताना तिला होळी विषयी प्रश्न विचारण्यात आले. एका पत्रकाराने तिला होळीच्या रंगाविषयी प्रश्न विचारला की ती होळीचे रंग का नाही लावून घेत त्यावर उत्तर देताना हसत हसत आलिया म्हणाली मला रंगांची ऍलर्जी आहे. त्याने माझ्या स्कीनला खाज येते म्हणून मी रंग खेळत नाही.

त्यानंतर लगेचच तिला दुसरा प्रश्न विचारण्यात आला की तुला माहिती आहे का होळी का साजरी केली जाते. या पत्रकाराच्या प्रश्नावर आलिया तिथून निघून जायला लागली पण तिला ते दुर्लक्ष करणं योग्य वाटलं नाही आणि ती रागात परत आली आणि हा प्रश्न विचारलेल्या पत्रकारावर भडकली. रागाने भडकलेल्या आलियाने त्या पत्रकारालाच उलट विचारते की, तुला साऊथ आफ्रिकाचे राष्ट्राध्यक्ष माहिती आहेत का? सिंगापूरचे, चीनचे तरी राष्ट्राध्यक्ष कोण आहेत माहित आहे का? एवढं बोलून आलियाचा राग शांत झाला नाही तर ती जाताना बोलली मला असे प्रश्न विचारु नका ज्याची उत्तर तुम्हाला स्वतःला देखील माहीत नाहीत. 

आलियाला नेहमीच तिच्या सेन्स ऑफ ह्युमरवरुन ट्रोल केलं जातं. इतकंच नाही तर आलियावरंच सगळ्यात जास्त मीम्स बनवले जातात. कधी कधी आलिया स्वतः या मीम्सची मजा घेते तर कधी कधी तिला ही मस्करी सहन होत नाही.   

alia bhatt brutally angry on media for simple question on holi  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT