Alia Bhatt Instagram
मनोरंजन

Alia Bhatt: मुलीच्या जन्मानंतर आलिया करतेय 'या' अडचणींचा सामना.. वारंवार घ्यावे लागतायत डॉक्टरांचे सल्ले..म्हणाली..

एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट्टनं काम आणि मूल यांच्यात बॅलन्स साधताना दमछाक होतेय हे सांगत काही हैराण करणारे खुलासे केलेयत.

प्रणाली मोरे

Alia Bhatt: बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये आलिया भट्टचं नाव सामिल आहे,पण आलिया सध्या तिची मुलगी राहाचं संगोपन आणि काम यांच्यामध्ये पूर्णतः फसली आहे. आई बनल्यानंतर आलिया आता शूटिंगवर परतली आहे. करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त आहे, पण बाळाला घरी सोडून कामावर परतणं आई म्हणून आलियासाठी सोपं काम नाहीय. आलियाला याच्यासाठी थेरपी घ्यावी लागतेय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं याचा खुलासा केला आहे.

एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत आलियानं सांगितलं आहे की तिला या गोष्टीची कायम चिंता लागून राहिलेली असते की ती आपली मुलगी आणि कामात कसा ताळमेळ साधेल? आलिया म्हणाली,''ही फक्त पाच-दहा दिवसांची गोष्ट नाही जे एकदम ठीक होणार आहे. यामधून बाहेर यायला वेळ लागणार आहे. तुम्हाला या सगळ्या कामातून स्वतःसाठी वेळ काढावा लागणार आहे''. (Alia Bhatt come back on shooting after baby there is so much pressure i go to therapy every week)

मुलगी राहा संदर्भात बातचीत करताना आलिया म्हणाली की, ''राहा खूप आनंदी राहणारी मुलगी आहे. तुम्ही तिच्याकडे पाहून जरादेखील हसलात तर ती देखील लगेच तुमच्याकडे पाहून हसते. म्हणून रणबीर आणि मी तिला 'चीता' अशी हाक मारतो''. अर्थात आपल्याप्रमाणे राहाचा देखील मूड स्विंग्स होतो असं आलिया म्हणाली.

आलिया म्हणाली की,''ती खूपच कंट्रोल फ्रीक आहे. मला नेहमीच परफेक्ट गोष्टी आवडतात आणि मला प्रत्येक गोष्टीत बॅलन्स आवडतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच मी माझ्या कामाप्रती देखील पॅशनेट आहे''.

आलिया म्हणाली,''एका महिलेवर काम आणि मुलं या सगळ्याचंच खूप प्रेशर असतं. अर्थात आता हे म्हणणं खूप घीसंपीटं राहिल की मुल झाल्यानंतर आणि आई बनल्यानंतर महिलांचे करिअर संपते. आजकालच्या आयांसाठी ही गोष्ट खूप गरजेची आहे की त्यांनी स्वतःला वेळ द्यायला हवा आणि हे प्रत्येक कंपनीनं देखील लक्षात घ्यायला हवं. त्यांनी आपल्याकडे काम करणारी एखादी महिला जर आई बनली असेल तर तिला तो वेळ द्यायला हवा''.

आलिया भट्ट लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं शूटिंग याआधीच सुरू झालं आहे. धर्मा प्रॉडक्शन बॅनर अंतर्गत बनणारा हा सिनेमा पुढील वर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होणार आहे. या सिनेमात आलिया सोबत रणवीर सिंग देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT