Heart Of Stone Promo  esakal
मनोरंजन

Heart Of Stone: 'ब्रम्हास्त्र'तून थेट 'हॉलीवूड'मध्ये, आलियाची चांदी!

तब्बल चारशे कोटींमध्ये तयार झालेल्या ब्रम्हास्त्रला प्रेक्षकांनी मोठी दाद दिली आहे. यासगळ्यात आलियानं आणखी एक गु़ड न्युज दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Heart Of Stone First look Out: अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. एकीकडे बॉलीवूडमध्ये बॉयकॉट (Bollywood Actress Alia Bhatt) बॉलीवूडचा ट्रेंड सुरु असताना दुसरीकडे ब्रम्हास्त्रनं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करुन लक्ष वेधून घेतले आहे. (Bramhastra Movie) आलिया - रणबीरच्या ब्रम्हास्त्रनं आतापर्यत दोनशे कोटींचा टप्पा पार केला आहे. तब्बल चारशे कोटींमध्ये तयार झालेल्या ब्रम्हास्त्रला प्रेक्षकांनी मोठी दाद दिली आहे. यासगळ्यात आलियानं आणखी एक गु़ड न्युज दिली आहे.

आलिया ही आता हार्ट ऑफ स्टोन नावाच्या हॉलीवूडपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. सध्या सोशल मीडियावर आलियाच्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी तो लूक पाहताच तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून आलियाच्या हार्ट ऑफ स्टोनची चर्चा होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया पहिल्यांच हॉलीवूडपटामध्ये दिसणार आहे. गेल गेडॉट ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार असून आलिया यात किया धवनची भूमिका साकारत आहे.

नेटफ्लिक्सच्या वतीनं हार्ट ऑफ स्टोनची निर्मिती कऱण्यात आली आहे. सध्या हार्ट ऑफ स्टोनचे अॅक्शन सीन व्हायरलचा तो प्रोमो व्हायरल झाला असून त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. एका वाळवंटातून सुसाट वेगाने जाणाऱ्या मोटारबाईकनं त्या दृश्याची सुरुवात होते. त्यात गेल गेडॉट आणि रचेल स्टोन यांची अदा पाहायला मिळते.

यानंतर काही वेळातच आलियाची इंट्री होते. आलिया आणि जेमी डोर्नन या एकत्रित दिसतात. त्यांच्या स्टंटबाजीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी आलियाच्या या चित्रपटाचं तोंडभरुन कौतूक केले आहे. तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. सोशल मीडियावर बीटीएसच्या काही फुटेजमध्ये देखील ती दिसून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT