alia bhatt, alia bhatt movies, alia bhatt video, alia bhatt family, ranbir kapoor, alia bhatt viral video  SAKAL
मनोरंजन

Alia Bhatt Video: तुझा मुलगा मला खूप त्रास देतो.. पापाराझीच्या आईला भेटली आलिया, क्युट व्हिडिओ व्हायरल

आलियाने पाहताच ती लगेच त्या दिशेने गेली आणि हात जोडून पापाराझीच्या आईचे स्वागत केले.

Devendra Jadhav

Alia Bhatt meets paparazzo's mom at event Video Viral News: आलिया भट सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेली अभिनेत्री. आलिया विविध पोस्टस मधून आणि व्हिडिओमधून सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.

आलियाला नुकतंच गंगुबाई काठियावाडी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेयर पुरस्कार मिळाला.

आलिया अनेकदा फोटोग्राफर्स आणि पापाराझींसोबत मजा मस्ती करताना दिसते. आलियाचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झालाय. यात ती पापाराझीच्या आईसोबत हशामस्करी करताना दिसतेय.

(Alia Bhatt meets paparazzo's mom at event video viral)

आलिया भट्टने नुकतीच मुंबईत एका पापाराझोच्या आईची भेट घेतली. ती ग्लोबल स्पोर्ट्स पिकलबॉल चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाली होती. जिथे फोटोग्राफरने त्याच्या आईला आलियाला भेटायला आणले.

आलियाने आईसोबत केलेल्या संवादाचा एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. ज्यात ती मिडीयाचा तिचा पाठलाग केल्याबद्दल मस्करी करत असल्याची तक्रार करताना दिसत आहे.

इव्हेंटमध्ये आलिया कॅज्युअल लूकमध्ये पोहोचली. तिने पांढऱ्या टी-शर्टसोबत डेनिम पँट घातली होती.

व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे, ती फोटोसाठी पोझ देण्यासाठी थांबली होती जेव्हा तिने एका फोटोग्राफरला त्याच्या आईला घेऊन येताना पाहिले.

आलियाने पाहताच ती लगेच त्या दिशेने गेली आणि हात जोडून पापाराझीच्या आईचे स्वागत केले.

तिने त्या आईशी हात मिळवला आणि म्हणाली, “बडा अच्छा लगा आपसे मिलके (तुम्हाला भेटून आनंद झाला).

फोटोग्राफरकडे बोट दाखवत ती गमतीने म्हणाली, “आपका बेटा बोहोत परेशन करता है मुझे. नाही, बोहोत अच्छा काम करता है (तुमचा मुलगा मला सतत चिडवत असतो. पण नाही.. तो त्याच्या कामात चांगला आहे).

तिने त्या महिलेसोबत फोटोसाठी पोजही दिली आणि आपल्या मुलाला म्हणाली, “आरामसे लेकर जाओ (तिला नीट घरी घेऊन जा).” हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून आलियाच्या नम्रपणाचे आणि तिच्या हजरजबाबीपणाचे कौतुक केलंय.

आलियाने अलीकडेच मेट गाला 2023 मध्ये तिच्या उपस्थितीने चाहत्यांना आनंद दिला. ती लवकरच हार्ट ऑफ स्टोनमधून हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे, ज्यामध्ये गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांच्याही भूमिका आहेत.

याशिवाय आलिया करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्येही दिसणार आहे. या चित्रपटात ती गली बॉय नंतर रणवीर सिंगसोबत एकत्र दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: सोन्यातील गुंतवणुकीसाठी सरकारची नवी योजना; घरात ठेवलेल्या सोन्यावर मिळणार व्याज, काय आहे स्कीम?

Pandharpur Shegaon Railway : पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्गासाठी प्रयत्नांना बळ; पुण्यात DRM यांच्याशी सविस्तर चर्चा

Marathi News Live Updates : दुकाने फोडणारा परराज्यातील सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

Pune News: सिंहगडावर प्रवेशाची नवी पद्धत! ॲपद्वारे पूर्वनोंदणी, गर्दी वाढल्यास प्रवेश बंद, वन विभागाचा मोठा निर्णय

ICC Test Rankings: बुमराह खेळत नसूनही अव्वल, तर ट्रॅव्हिस हेडनं गमावलं पहिल्या क्रमांकाचं सिंहासन! आता कोण झालं 'नंबर वन'?

SCROLL FOR NEXT