Alia Bhatt Instagraam
मनोरंजन

Alia Bhatt: मुलीच्या जन्मानंतर आयुष्यात झालेल्या बदलांवर पहिल्यांदाच मोकळेपणानं बोलली आलिया..म्हणाली..

आलिया भट्टनं ६ नोव्हेंबर २०२२ रोजी राहा कपूर या आपल्या मुलीला जन्म दिला..तिनं पोस्ट करत आपल्या आयुष्यातील बदलांविषयी सांगितले आहे.

प्रणाली मोरे

Alia Bhatt: 'गंगूबाई काठियावाडी' फेम आलिया भट्टनं ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आपली मुलगी राहाला जन्म दिला. ती आई बनली आणि रणबीर कपूर बनला पप्पा.

नीतू कपूर आणि सोनी राझदान आजी तर महेश भट्ट आजोबा...रिदिमा..करिष्मा..करिना कपूर बनल्या आत्या...अख्खं कपूर कुटुंब आनंदात न्हाऊन निघालं.

पण त्यासोबतच आलिया आणि रणबीर च्या आयुष्यात पालक म्हणून खूप मोठे बदल पहायला मिळाले. आलियानं तर मीडियासमोर आपल्या शारिरीक बदलांविषयी याआधीच संवाद साधला होता.(Alia Bhatt On Motherhood)

आलिया भट्टनं राहाला जन्म दिल्यानंतर योगा करायला सुरुवात केली आहे. तिनं खास योगा क्लास त्यासाठी लावला आहे. तिनं प्रसूतीनंतर लवकरच आपल्याला फीट केलेलं दिसत आहे. अद्याप तिनं राहा कपूरचा चेहरा मीडियासमोर आणलेला नाही आणि पुढील एक वर्षापर्यंत ती आपल्या मुलीचा चेहरा समोर आणणार नाही अशी देखील बातमी आहे. आणि तशा सूचना आलिया आणि रणबीरनं मीडियाला देखील दिल्या आहेत. असो...आता समोर आलं आहे ते मुलीच्या जन्मानंतर आलियाच्या आयुष्यात झालेले काही मोठे बदल.

आलियानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिनं सांगितलं होतं की आई झाल्यानंतर तिच्यात खूप बदल झाले आहेत. पोस्टमध्ये तिनं लिहिलं होतं की-''आई झाल्यानंतर माझ्यात खूप बदल झाले. माझं शरीर,माझे केस,माझे स्तन,माझी त्वचा,माझ्या प्रायोरिटीज आणि माझ्यातील भीती ..सारंच बदललं..आई बनल्यानंतर माझं मन खूप खंबीर झालं आहे आणि खूप प्रेमळ झालंय''.

Alia Bhatt Post

आलिया लवकरच आपल्याला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात रणवीर सिंग सोबत दिसणार आहे, 'तख्त' सिनेमात आलिया जान्हवी कपूर,करीना कपूर,भूमी पेडणेकरसोबतही दिसणार आहे. त्यानंतर लवकरच ती हॉलीवूड सिनेमातही पदार्पण करत आहे. गॅल गॅडोटसोबत ती 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT