Alia Bhatt Baby Photo esakal news
मनोरंजन

Alia Bhatt Baby Photo: 'ही नक्की आलियाचीच मुलगी ना'? फोटो व्हायरल होताच...

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीरची गुड न्युज समोर आली. चाहत्यांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Alia Bhatt and Ranbir Kapoor's baby girl's: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीरची गुड न्युज समोर आली. चाहत्यांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आलियाच्या प्रेग्नंसीची चर्चा सुरु होती. अनेकांनी तर तिला बाळ होताच तिच्या लग्नाची तारीख आणि प्रेग्नंसी याचा हिशोब लावण्यापर्यत मजल मारली होती. आलिया रणबीरच्या लाडक्या लेकीचं नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी स्वागत केलं आहे.

सोशल मीडियावर सेलिब्रेटींचे, त्यांच्या घरच्यांचे फोटो व्हायरल होणे आणि त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया येणं ही नित्याची गोष्ट आहे. मात्र सेलिब्रेटींनी आपल्या नवजात मुलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ न देणे यासाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे. यापूर्वी करिना कपूर, अनुष्का शर्मानं मीडियाच्या व्यक्तींवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. अनुष्का-विराटच्या वामिकाचा फोटो पापाराझींनी काढल्यानंतर अनुष्का संतापली होती. मी अनेकदा विनवणी करुनही तुम्ही मुलीचा फोटो का काढला असा प्रश्न तिनं विचारला होता.

हेही वाचा- बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

आता आलियाच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे या दाम्पत्यानं अजुनही अधिकृतरीत्या कोणताही फोटो व्हायरल केला नसून नेटकऱ्यांच्या क्रिएटिव्हीटाला उधाण आल्याचे दिसून आले आहे. त्याचाच परिणाम की काय आलिया आणि तिच्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर दिसू लागला आहे. त्यावर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकानं तर आलिया ही नक्की तुझीच मुलगी आहे ना असा प्रश्न तिला विचारला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर आणि आलियाकडून कोणताही फोटो शेयर करण्यात आलेला नाही. चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रेटींचे फोटो पाहणे नेहमीच आवडते. तो त्यांच्या कुतूहलाचा भाग असतो. अशातच आलिया आणि रणबीरच्या मुलीचा फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. फोटोशॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोटो सोशल मीडियावर आले आहेत. हॉस्पिटलच्या प्रशासनानं देखील आमच्याकडून कोणत्याही प्रकारे फोटो व्हायरल करण्यात आले नसून हे कुण्या एकानं म़ॉर्फ केलेले फोटो आहेत. असे स्पष्टीकरण दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT