Ranbir Alia  esakal
मनोरंजन

Alia Bhatt : 'रणबीरपेक्षा मी कमी नाही!' रणबीरच्या प्रेमप्रकरणांवर आलियाची सडेतोड प्रतिक्रिया

बॉलीवूडमध्ये आपल्या देखणेपणामुळे आणि प्रभावी अभिनयामुळे प्रसिद्ध झालेल्या रणबीरच्या नावाची नेहमीच चर्चा होत असते.

सकाळ डिजिटल टीम

Alia Bhatt Ranbir Kapoor Love Story past make respect : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टनं रणबीर कपूरशी लग्न केलं. त्या लग्नाची मोठ्या प्रमाणावर चर्चाही झाली होती. आलियापूर्वी रणबीरचं दीपिका पदुकोण, कतरिना कैफसोबत नावं जोडलं जात होतं. त्यानं त्या दोन्ही अभिनेत्यांना डेट केलं होतं. त्यानंतर आलियासोबत त्याचं प्रेमप्रकरण सुरु केलं. ते लग्नबेडीत अडकलं. यासगळ्यात रणबीरला अजुनही त्याच्या भुतकाळाविषयी डिवचलं जातंय.

बॉलीवूडमध्ये आपल्या देखणेपणामुळे आणि प्रभावी अभिनयामुळे प्रसिद्ध झालेल्या रणबीरच्या नावाची नेहमीच चर्चा होत असते. आताही रणबीर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा भुतकाळ त्यावरुन त्याला नेहमीच ट्रोल केले जाते. शेवटी आलियानं त्यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. तिनं रणबीरची बाजू घेत त्या गोष्टीला पूर्णविराम दिला आहे. आलिया-रणबीरच्या ब्रम्हास्त्रला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्या चित्रपटातून त्यांची केमिस्ट्री किती प्रभावी आहे हे दिसून आले होते.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

२०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीमध्ये आलियानं आमचं जगणं आता किती सोपं झालं आहे हे सांगितलं होतं. तुम्ही रणबीरला नेहमीच त्याच्या एक्स गर्लफ्रेंड वरुन चिडवत असता. त्याचीच चर्चा करत असता. पण त्यातील सत्यता जाणून घेत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ती वेगळी फेज येते. तेव्हा आपण अनेकदा निर्णय घेताना अडचणीत येतो. त्याच्याही आयुष्यातही ते झाले. पण म्हणून प्रत्येकवेळी त्याला त्यावरुन लक्ष्य करणे चुकीचे आहे. अशी प्रतिक्रिया आलियानं दिली होती.

तुम्ही जेव्हा रणबीरला त्याच्या पूर्वीच्या गर्लफ्रेंडवरुन बोलता तेव्हा मलाही तोच प्रश्न लागू होतो की.. मी पण काही कमी नाही हे तुम्हाला माहीती आहे. तेव्हा आमच्यातील बॉडिंग हे एकमेकांमधील संवादानं आणखी मजबूत झाले आहे. नात्यामध्ये शेवटी एकमेकांवरील विश्वास जास्त महत्वाचा ठरतो. हे मला सांगायचे आहे. भूतकाळातील गोष्टींवरुन कुणाची पारख करु नये. अशा शब्दांत आलियानं तिच्या भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT