alia bhat, ranbir kapoor, animal SAKAL
मनोरंजन

Alia Bhatt Ranbir Kapoor Film Clash: नवरा - बायकोचे सिनेमे एकमेकांसमोर धडकणार, कोण घेणार माघार ?

आलिया आणि रणबीरच्या सिनेमाची अशी काटे कि टक्कर रंगणार आहे.

Devendra Jadhav

आलीय भट आणि रणबीर कपूर यांना काहीच महिन्यांपूर्वी गोंडस मुलगी झाली. दोघा नवरा बायकोची सोशल मीडियावर चर्चा असते. पण लवकरच नवरा बायकोचे सिनेमे कॅल्श होणार आहेत. त्यामुळे आलीया - रणबीरच्या सिनेमांची टक्कर होणार आहे. आलिया हॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. तिचा पहिला हॉलिवूड सिनेमा रिलीजच्या मार्गावर आहे.

आलिया भट्टने तिचा हॉलिवूड डेब्यू सिनेमा 'हार्ट ऑफ स्टोन' मधील काही नवीन फुटेज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या सिनेमात अभिनेत्री गल गॅडोट आणि अभिनेता जेमी डोरन हे हॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ११ ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्स वर रिलिज होणार आहे. तर दुसरीकडे रणबीरचा 'अ‍ॅनिमल' सिनेमा सुद्धा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

खास गोष्ट म्हणजे 11 ऑगस्टलाच आलियाचा पती रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' सिनेमाची सध्याची रिलीज डेट आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित क्राईम ड्रामा असलेला सिनेमा ११ ऑगस्टला जगभरातील थिएटरमध्ये होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

रणबीरचा 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा बाप -मुलाच्या कथेभोवती फिरणारा आहे. एक मुलगा त्याच्या वडिलांसाठी काय करतो अशी हटके कथा या सिनेमाची आहे.

सिनेमाच्या कलाकारांमध्ये रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी देखील प्रमुख भूमिकेत आहेत. 'ब्रम्हास्त्र' नंतर रणबीरच्या या 'अ‍ॅनिमल' सिनेमाची सर्वाना उत्सुकता आहे. अशाप्रकारे आलिया आणि रणबीरच्या सिनेमाची अशी काटे कि टक्कर रंगणार आहे. त्यामुळे कोणता सिनेमा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरणार हे ११ ऑगस्टलाच कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT