Ranbir Kapoor & Alia Bhatt Google
मनोरंजन

रणबीर-आलियाच्या लग्नाशी नंबर '8' चं आहे मोठं कनेक्शन; वाचा सविस्तर

काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आलिया-रणबीर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

प्रणाली मोरे

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया(Alia Bhatt)चं लग्न म्हणजे मीडियासाठी ब्रेकिंग बातम्या असं समीकरण सध्या होऊन गेलंय. येणाऱ्या १६ तारखेला रणबीर कपूरच्या चेंबुर स्थित पूर्वजांच्या आर.के हाऊसवर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण इथेच लव्हबर्ड्स आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लग्न करणार आहेत. बातमी आहे की येत्या १३ एप्रिलपासनं पारपंरिक पंजाबी पद्धतीनं या दोघांच्या विवाहसोहळ्याला सुरुवात होणार आहे. अद्याप यावर कपूर कुटुंबाकडनं कोणीच काही बोलत नाही आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार दोघे कन्फर्म १६ एप्रिलच्या च्या पहाटे लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. सगळ्यांच्या लक्षात एव्हाना आलं असेल तर आता हे लग्न एक दिवस आधी म्हणजे १७ ऐवजी १६ एप्रिलला होत आहे.

पिंकव्हिलानं दिलेल्या माहितीनुसार आलिया-रणबीरचं लग्न सकाळी लवकर होणार आहे. 16 एप्रिलच्या पहाटे 2.00 ते 4.00 या वेळेत आकाशातील ताऱ्यांच्या साथीनं हे लग्न होणार आहे. ही खरी पंजाबी महत्त्वाची परंपरा. पंजाबी पारंपरिक लग्न हे असं भल्या पहाटेच होतं. असं म्हटलं जातंय की दोघांच्या लग्नासाठी न्यूमरोलॉजीला महत्त्व देण्यात आलं आहे. 16 एप्रिल,2022 ला जेव्हा आपण जोडतो तेव्हा रणबीर कपूरचा लकी नंबर '8' तयार होतो. म्हणजे 16(Date) +4(month)+2022(year)=2042 म्हणजेच 2042= 2+0+4+2='8' आता यातील आपल्याला फार काही कळत नसलं तरी लग्न आता नंबर '8' च्या कनेक्शनमुळे एक दिवस आधी होणार आहे. रणबीरसाठी नंबर '8' हा लकी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. लग्नाआधी मेहेंदी ,संगीत असे सगळे सोहळे रीतसर पार पडणार आहेत. आधी खरंतर बातमी होती की हे दोघे परदेशात लग्न करणार आहेत. पण एका महत्त्वाच्या सूत्रांनं टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार,कपूर्स आपल्या कुटुंबाला खूप महत्व देतात. तसंच रणबीरच्या जनरेशनचं हे शेवटचं लग्न आहे. त्यामुळे त्यांना या लग्नात परंपरेचा मान राखत,पूर्वजांना सन्मान देत हे लग्न करायचं आहे. आता सर्वांनाच आलिया-रणबीर यांच्या नात्याविषयी माहित आहे,त्या दोघांनी यावरचा पडदा केव्हाच काढला आहे. पण लग्नानाची इतकी चर्चा होतानाही दोघांनी किंवा कपूर कुटुंबियांनी चुप्पी का साधली आहे हा प्रश्नच आहे.

रणबीर-आलिया लवकरचअयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमात पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा 3 भागात प्रदर्शित केला जाणार आहे. सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून आता सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे पण त्याआधी नक्कीच रणबीर-आलियाचं शुभमंगल सावधान चाहत्यांना पहायचं असणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''तात्काळ हल्ले थांबवा, नाहीतर...'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराण-इस्रायलला इशारा; पुढच्या दोन दिवसात सगळं थांबणार?

Ujjwala Scheme: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका! केंद्र सरकारने सबसिडीच्या सिलिंडरची संख्या घटवली; आता किती मिळणार?

Rave Party Case : रेव्ह पार्टी प्रकरण! तुळापुरातील फार्महाऊस सील; शिवराज्याभिषेक दिनीच पार्टी झाल्याने ग्रामस्थांचा संताप

IND A Tri-Series: वैभव सूर्यवंशीकडे लक्ष, भारतीय अ संघ श्रीलंकेत खेळणार वनडे तिरंगी मालिका! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामने?

Online Fertilizer Sales : ऑनलाईन खत विक्रीमुळे शेतकरी मेटाकुटीस; राज्यातून फक्त दोनच जिल्हयांसाठी जाचक अटी

SCROLL FOR NEXT