Alia Bhatt with RRR director SS Rajamouli.  Google
मनोरंजन

इन्स्टाग्रामवरनं RRR च्या पोस्ट्स डिलीट करण्यावर आलियाचं स्पष्टिकरण

आलिया भट्ट दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्यावर नाराज असल्याची अफवा काही दिवसांपूर्वी पसरली होती.

प्रणाली मोरे

एस.एस.राजामौली(S.S.Rajamouli) दिग्दर्शित 'RRR' सिनेमानं आतापर्यंत तब्बल ७०० करोडचा बिझनेस केला आहे. एस. एस. राजामौली दिग्दर्शित या सिनेमात रामचरण,ज्युनिअर NTR यांच्यासोबतच बॉलीवूडचे दोन सुपरस्टार आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि अजय देवगण(Ajay Devgan) यांच्याही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा होत्या. आलियानं देखील सिनेमाचं प्रमोशन दमदार केलं होतं. प्रमोशन दरम्यान तिनं नेसलेल्या सिल्कच्या साउथ इंडियनं साड्यांनी सर्वांचं मन जिंकलं होतं. ती त्यावेळी सिनेमाविषयी खुप उत्सुकही दिसली होती. पण असं अचानक काय घडलं की आलियानं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरनं RRR संदर्भातल्या पोस्ट्स डिलिट केल्या. पण त्यानंतर मात्र उलट-सुलट चर्चा रंगली की आलियाचं दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्याशी बिनसल्यानं तीनं हे पाऊल उचललं. पण आता या अफवांवर चुप्पी तोडत आलियानं स्पष्टिकरण दिलं आहे.

बॉलीवूड अभिनेत्रीनं तिच्याविषयीच्या अफवांना पूर्णविराम देताना एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटलंय,''मी माझ्याविषयी लोकांना बोलताना ऐकलंय की 'RRR' च्या पोस्ट्स मी वादामुळे डिलीट केल्या आहेत. कारणही सांगते की लोकं म्हणतायत माझे सिनेमाच्या टीमसोबत खटके उडाले आहेत. मी नाराज आहे. पण माझी विनंती आहे की अशा अफवा पसरवू नका. ते पण फक्त इन्स्टाग्रामवरनं मी पोस्ट डिलीट केल्या म्हणून. मी नेहमीच जुन्या पोस्ट रीअलाइन करते की जेणेकरुन लोकांना नवीन पोस्ट पाहता येतील. मला माझ्या प्रोफाईलला स्वच्छ,सुटसुटीत ठेवायला आवडतं. उगाचच पोस्टची गर्दी मला आवडत नाही''. आलियानं पुढं लिहिलं आहे की, ''RRR चा मी एक भाग बनले यासाठी मी कायम राजामौली यांची आभारी राहीन. सिनेमात 'सीता' ही व्यक्तीरेखा साकारुन मला खुप आनंद झाला आहे. राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजते. तारक आणि चरणसोबत काम करणं हा एक सुंदर अनुभव होता. मी सिनेमाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची आभारी रहीन ज्यांनी मला खूप चांगला अनुभव दिला''.

Alia Bhatt Instagram post image

आलियानं आपल्याविषयी पसरलेल्या अफवांवर स्पष्टिकरण देताना पुढे लिहिलंय,''या सिनेमावर राजामौली सरांनी खूप वर्ष खर्ची घातले म्हणून इतकी चांगली कलाकृती पहायला मिळाली. सिनेमाविषयी ज्या चुकीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत त्यात काही तथ्य नाही हे मी इथे स्पष्ट करते''. आलियानं यासोबतच फायर,वॉटर आणि रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. आलिया एस.एस.राजामौली यांच्यावर नाराज आहे अशी बातमी काही दिवसांपूर्वी होती. RRR मधनं आलियाच्या सीन्सची लांबी कमी करण्यात आली आहे,सिनेमाच्या फायनल एडिटिंगमध्ये हे करण्यात आलं त्यामुळे आलिया नाराज असल्याचं कारण कळालं होतं. आलियानं सोशल मीडियावरनं RRR च्या पोस्ट डिलिट करण्यामागे हेच कारण आहे अशी अफवा पसरली होती. त्यात आलियानं राजामौली यांना अनफॉलो केलं असं देखीलं बोललं गेलं. पण यात काही तथ्य नाही हे आलियानं आता स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, एका विवाहितेच्या आत्महत्येशी संबंध? शवविच्छेदन अहवाल बदलण्याचं रॅकेट?

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी शिवसेना नेत्याची सून होणार, साखरपुड्यातील व्हिडिओ व्हायरल, होणारा नवरा काय करतो?

UPI Mapper ने घातलाय धुमाकूळ! UPI अ‍ॅप्सच्या हुशारीमुळे युजर्स गोंधळात; NPCI ने घेतला मोठा निर्णय, ऑनलाइन पेमेंट करत असाल तर हे एकदा बघाच

रोहित शर्मा, विराट कोहली आता पुन्हा केव्हा निळ्या जर्सीत दिसणार? २०२७च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

BJP Leader Crime : भाजप नेत्याची गुंडागर्दी! शेतकऱ्याला कारखाली चिरडून मारले, वडिलांना वाचवायला आलेल्या मुलींचेही फाडले कपडे

SCROLL FOR NEXT