Alia Bhatt On Repeating Saree In National Award:  Esakal
मनोरंजन

National Film Awards 2023: 'ती' साडी नेसण्यामागे आलियानं काय सांगितलं कारण? पोस्ट शेअर करुन वेधलं लक्ष

Alia Bhatt On Repeating Saree In National Award: 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्ट तिच्या आउटफिटमुळे चर्चेत आली होती. आता तिने ही साडी का निवडली याचा खुलासा स्वत:च केला आहे.

Vaishali Patil

Alia Bhatt On Repeating Saree In National Award: मंगळवारी दिल्लीत आयोजित '69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023'ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या सोशल मिडियावर या पुरस्कार सोहळ्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. याच सोहळ्यावेळी आलिया भट्टने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पुरस्कार स्वीकारला.

या सोहळ्यात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती मात्र लक्ष वेधून घेतलं ते आलियाच्या साडीने. आलियाने या खास सोहळ्यासाठी तिच्या लग्नाची साडी निवडली होती. तिचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिची साडी लग्नाचीच आहे हे लगेच ओळखलं त्यानंतर आलियाने देखील या खास सोहळ्यासाठी लग्नाची साडी का निवडली याचा खुलासा केला आहे.

'69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी तिला हा पुरस्कार मिळाला. यावेळी आलियाने तिच्या लग्नात जी पांढरी साडी नेसली होती तीच या कार्यक्रमावेळी निवडली. यावेळी रणबीर देखील तिच्यासोबत दिसला.

Alia Bhatt On Repeating Saree In National Award

या सोहळ्यानंतर आलियाने पोस्ट शेअर करत लिहिले की, "एका खास दिवसासाठी एक खास पोशाख आवश्यक असतो आणि कधीकधी तो पोशाख आधीच आपल्याकडे असतो. जो एकदा खास आहे तो पुन्हा स्पेशल होऊ शकतो. रीवियर, रीयूज, रिपीट"

आलियाने परिधान केलेली ही साडी सब्यासाचीने डिझाइन केली होती. आलियाने या ऑफ व्हाईट साडीसोबत मॅचिंग ज्वेलरी परिधान केली होती. आता आलियाने साडी तिच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या प्रसंगी वापरुन अविस्मरणीय केली आहे. तर यावेळी रणबीर कपूरने काळा कुर्ता-पायजमा परिधान केला होता.

रणबीरने देखील यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर पोहोचली तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेला रणबीर तिचा व्हिडिओ बनवताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर यावेळी खुप आनंद होता.

आलियाने तिच्या नॅशनल अवॉर्ड सोहळ्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. पुरस्कारासाठी पती रणबीरसोबत पोज देताना ती खूप आनंदी दिसत होती. हे फोटो शेयर करत तिने लिहिले की, "एक चित्र, एक क्षण, आयुष्यभराची आठवण." सध्या आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT