Alia Bhatt
Alia Bhatt Gangubai Kathiawadi movie
मनोरंजन

...म्हणून आलियाला मिळाली 'गंगुबाई काठियावाडी', भन्साळींनी केला खुलासा

सकाळ डिजिटल टीम

आलिया भट्ट (Alia Bhatt) अभिनेत्री म्हणून बॉलीवूड सिनेमात (Bollywood movies) 10 वर्षे पूर्ण करत आहे. आलियाने तिच्या कारकिर्दीत नियमित अंतराने ऑफबीट पात्रे साकारून तिचे चाहते आणि समीक्षक दोघांनाही थक्क केले आहे. 'हायवे', 'उडता पंजाब', 'डियर जिंदगी', 'राझी' आणि 'गली बॉय' हे तिच्या अभिनय प्रवासातील महत्त्वाचे टप्पे ठरले आहेत. धुकधुकी आता 'गंगुबाई काठियावाडी'ची आहे. अतिशय ज्वलंत चित्रपट दिग्दर्शक आणि शांत, साधी आणि सहज जाणारी अभिनेत्री आलिया भट्ट यांचे मिलन स्वतःच मनोरंजक आहे. दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि अभिनेत्री सोनी राजदान (Soni Razdan) यांची मुलगी आलिया भट्टला करण जोहरने (Karan Johar) सिनेमात संधी दिली होती. पण, तिने सतत केलेल्या मेहनतीने हिंदी चित्रपटसृष्टीत अव्वल स्थान गाठले आहे. (Gangubai Kathiawadi Bollywood Movie)

आलियाला एका मुलाखतीत विचारले की, संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) तुझ्यासोबत 'इंशाअल्लाह' (Inshallah) बनवणार होते, तर 'गंगूबाई काठियावाडी' कसा घडला? त्याच्यावर ती म्हणाली, ''होय, मलाही कधी कधी वाटतं की कदाचित 'इंशाअल्लाह' झाली असती तर कदाचित 'गंगूबाई' घडली नसती. कधीकधी वाईट अनुभव तुम्हाला चांगल्या भावना देऊ शकतात. कधी कधी आयुष्यात चांगल्या कारणांसाठी वाईट गोष्टी घडतात. माझ्यावर अन्याय झाला असे मला त्यावेळी वाटले. पण मी तुझ्यासोबत चित्रपट बनवण्याचे वचन दिल्याचे त्यांनी सांगितले. तु जा, दोन आठवडे मजा करा आणि मग परत ये. आणि मग मी आल्यावर त्यांनी मला 'गंगुबाई'ची स्क्रिप्ट दिली. हे पात्र पहिल्यांदा बघून मलाही भीती वाटली की या पात्रासाठी ते मला का घेत आहेत!''

आलियाने या चित्रपटाच्या बोलीसाठी अनेक वर्कशॉप केले आणि स्वत:ला तयार केले. तिला आनंद आहे की, 3 वर्षांनंतर अखेर हा चित्रपट रिलीज होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT