Alia Bhatt sharing latest picture, said celebrating diwali on bed Instagram
मनोरंजन

Alia Bhatt: आलियानं कशी साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी?, लेटेस्ट फोटो शेअर करत म्हणाली...

बॉलीवूडमध्ये रंगणाऱ्या दिवाळी पार्ट्यांपासून सध्या रणबीर आणि आलिया दोघांनीही स्वतःला दूर ठेवलं असल्यानं जोरदार चर्चा रंगली होती.

प्रणाली मोरे

Alia Bhatt: बॉलीवूडमध्ये सध्या जोरदार दिवाळी पार्ट्या रंगताना दिसत आहेत,ज्यामधनं बड्या बड्या सेलिब्रिटींची उपस्थिती लक्ष वेधून घेताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात आयुषमान खुराना,तापसी पन्नू,एकता कपूर,अबू जानी,रमे तोरानी आणि आंनद पंडित यांच्यासोबत अनेकांनी दिवाळी पार्ट्यांचे आयोजन केले होते. अभिषेक बच्चन,ऐश्वर्या राय-बच्चन, करिष्मा कपूर, माधुरी दिक्षित,विकी कौशल,कतरिना कैफ,अक्षय कुमार,हृतिक रोशन असे बडे कलाकार या पार्ट्यांना उपस्थित राहिले होते. पण रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यापैकी कुठल्याच पार्टीत नजरेस पडले नाहीत. आता आलियानं इन्टाग्रामवर लेटेस्ट फोटो पोस्ट करत यामागचे कारण सांगितले आहे.(Alia Bhatt sharing latest picture, said celebrating diwali on bed)

लग्नानंतरची आलियाची ही पहिली दिवाळी आहे. त्यामुळे अर्थातच चाहत्यांना रणबीर आणि आलियाचे दिवाळी फोटो पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती,पण हे कपल कुठल्याच पार्टीत नजरेस पडलं नाही. आलियानं आता लेटेस्ट फोटो शेअर करत यामागचं कारण सांगितलं आहे. लवकरच रणबीर-आलिया आई-वडील होणार आहेत. त्यामुळे आलिया म्हणालीय,''यावर्षी माझी दिवाळी बेडवरच आराम करत मी साजरी करत आहे''.

आलियानं इन्स्टाग्रामवर २ फोटो शेअर केले आहेत. एक गेल्या वर्षीचा दिवाळीचा फोटो आहे,ज्यात तिनं निळ्या रंगाचा लहंगा परिधान केला आहे आणि हातात मेणबत्ती पकडलेली आहे. दुसऱ्या लेटेस्ट फोटोत तिनं कॅज्युअल टी-शर्ट परिधान केला आहे आणि ती बेडवर आराम करताना दिसत आहे. तिच्या मागे तिची कॅट अॅडवर्ड आहे. आलियानं फोटो पोस्ट करत कॅप्शन दिलं आहे की,''शुभ दिपावली,एक गेल्या वर्षीचा फोटो आहे आणि एक आताचा फोटो आणि त्यातील मी,यंदा दिवाळी बेडवरच साजरी करत आहे''.

आलियाचा आगामी सिनेमा फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' आहे. या सिनेमात तिच्यासोबत प्रियंका चोप्रा,कतरिना कैफ आहेत. याव्यतिरिक्त करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातही ती दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणवीर मुख्य भूमिकेत आहे. आलियाचा हॉलीवूड सिनेमाही लवकरच आपल्या भेटीस येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT