Darlings Trailer Out news  esakal
मनोरंजन

Darlings Trailer Out: नवऱ्याला मारण्यासाठी दिलं उंदराचं औषध

कुणी काही का म्हणेना पण आलियासाठी हे वर्ष मात्र चांगलचं लकी ठरताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

Darlings Trailer Out: कुणी काही का म्हणेना पण आलियासाठी हे वर्ष मात्र चांगलचं लकी ठरताना दिसत आहे. यावर्षी लग्न, याच वर्षी गुड न्युज, आणि तिनं (bollywood actress alia bhatt) आता स्वताचे प्रॉडक्शन हाऊसही सुरु केलं आहे. ती तिच्या प्रॉडक्शन हाऊसची पहिली फिल्म लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. आता त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा (social media viral trailer) जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आलिया त्यात हटक्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. डार्क कॉमेडी प्रकारातील या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. आलियाच्या गंगुबाई काठियावाडीला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.

आलियाचा यावर्षी रणबीरसोबत ब्रम्हास्त्र नावाचा चित्रपट येणार आहे. त्याची (shefali shah) चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. अनेक वर्षांपासुन या चित्रपटाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आलियानं नवीन प्रॉडक्शन सुरु करुन चाहत्यांना धक्का दिला आहे. डार्लिंग्स असे त्या चित्रपटाचे नाव आहे. त्यात आलियाच्या जोडीला प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शहाही दिसणार आहे. डार्लिंग्सच्या ट्रेलरला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. (bollywood movie) डार्लिंग्समध्ये गंमतीचा भाग सांगायचा झाल्यास त्यात विजय वर्मा हे आलियाच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

विजय वर्मा आणि आलियाच्या लग्नात अनेक डार्क सिक्रेट्स आहेत. आलियाच्या पतीला दारुचे व्यसन आहे. त्यामुळे ती त्रस्त आहे. पती तिला मारहाण करतो. तिचा मानसिक- शाररिक छळ करतो. काही झालं तरी आपण सुधारणार नाही. असे त्यानं सांगितलं आहे. त्यामुळे आलियाचा त्याला बदलण्याचा प्रयत्न आहे. त्याला यश येते किंवा नाही हे डार्लिग्ज पाहिल्याशिवाय कळणार नाही. शेफालीनं आलियाच्या आईची भूमिका सांगितली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन जसमीत के रीन यांनी केलं आहे. त्यांनीच या चित्रपटाची कथाही लिहिली आहे. निर्माती म्हणून आलिया भट्ट आहे. याशिवाय गौरी खान आणि विजय वर्मा यांचे नाव देखील त्यात सहभागी आहे. आलियाच्या सनशाईन नावाच्या प्रॉडक्शन हाऊसच्या वतीनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. विजय वर्मा यांच्याशिवाय रोशन मॅथ्यु, राजेश वर्मा यांच्याही महत्वाच्या भूमिका डार्लिंग्जमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Commission Report : दबावाखाली अर्ज माघारी? पुण्यातील बिनविरोध निवडणुकांवर आयोगाचा रिपोर्ट कार्ड

Shubman Gill : शुभमन गिलला संघातून वगळले, पुनरागमन लांबणीवर पडले; निवड समितिच्या निर्णयाने सर्वच अचंबित

Panchang 3 January 2026: आजच्या दिवशी दशरथ विरचित शनिस्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pume Municipal Election : भाजपच्या अनेकांचे बंड झाले थंड

अक्षय खन्नाने भर मंडपात गर्लफ्रेंडला केलेला किस, प्रेमात होता पुर्णपणे वेडा, कोण होती ती अभिनेत्री?

SCROLL FOR NEXT