Alia Bhatt Trolled  esakal
मनोरंजन

Alia Bhatt : हे राम! आलिया होणार 'सीता' रणबीर होणार 'श्रीराम'! नेटकरी काय म्हणतात पहा

आलिया सीतेच्या भूमिकेत दिसणार म्हटल्यावर पुन्हा एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. कित्येक नेटकऱ्यांनी आलियावर टीका केली आहे.

युगंधर ताजणे

Alia Bhatt As Sita - नितेश तिवारीच्या रामायण चित्रपटाची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यात सीतेची भूमिका बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि श्रीरामच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर हे दोन्ही सेलिब्रेटी ट्रेडिंगचा विषय आहे. Alia Bhatt Sita Ramayan Movie Ranbir Kapoor As a Ram

आलिया सीतेच्या भूमिकेत दिसणार म्हटल्यावर पुन्हा एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. कित्येक नेटकऱ्यांनी आलियावर टीका केली आहे, तर काहींनी आलिया हीच सीतेच्या भूमिकेसाठी सर्वोत्तम कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ट्विटवर आलियाच्या नावाचा ट्रेंड सुरु झाला आहे. त्यात अनेकांनी आलियाच्या दिसण्यावरुन तिला नावं ठेवली आहे. तर एका युझर्सनं आलियासारखी अभिनेत्री सीतेची भूमिका करणार ऐकल्यावर खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे.

Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे

असं म्हटलं जातंय की, आलियानं देखील सीतेची भूमिका करण्यास होकार दिला आहे. आलियाच्या एका चाहत्यानं तिच्या नावाच्या फॅन पेजवर ती गोष्ट टाकून आलियाच्या बाकी चाहत्यांना ती गुड न्यूज सांगितली आहेत. याबाबत एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेयर होताना दिसतो आहे. असं सांगितलं जात होतं की, नितेश तिवारी या गेल्या काही महिन्यांपासून रामायण या त्यांच्या चित्रपटासाठी कलाकारांच्या शोधात होते. या चित्रपटाची निर्मिती मधू मंटेना यांनी केली आहे.

श्रीरामाच्या भूमिकेत आहे तरी कोण?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलिया भट्ट ही सीता मातेची भूमिका करणार असून श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार आहे. यापूर्वी हे दोघेजण ब्रम्हास्त्र नावाच्या चित्रपटामध्ये दिसले होते. त्यातील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाईही केली होती. पाचशे कोटींहून अधिक कमाई करत एक वेगळाच विक्रम या चित्रपटानं केला होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर कपूर हा श्रीरामाच्या रोलसाठी स्क्रिन टेस्ट देण्यात व्यस्त आहे. दुसरीकडे रावणाच्या भूमिकेत केजीएफ फेम यश दिसणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाविषयीची अधिक माहिती दिवाळी २०२३ मध्ये येणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT