Alia Bhatt slams Publication,post viral Google
मनोरंजन

Alia Bhatt Pregnancy: 'मी पार्सल नाही',आलियानं मीडियाला फटकारलं

आलियानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत मीडियाला फटकारत,''मी स्त्री आहे,पार्सल नाही'' असं वक्तव्या करत लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.

प्रणाली मोरे

आलिया भट्टनं(Alia Bhatt) तिच्या प्रेग्नेंसिविषयीची(Pregnancy) गूडन्यूज(GoodNews) चाहत्यांसोबत शेअर केली तेव्हा ती भलतीच खूश दिसत होती. पण काही वृत्तसंस्थांनी तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांच्या अशा काही हेडलाईन बनवल्या ज्यानं अभिनेत्री भलतीच चिडली आहे. तिनं मीडियाला पुरातन काळात जगणारे, मी स्त्री आहे पार्सल नाही अशी वक्तव्य करत आपला राग व्यक्त केला आहे. आलियाच्या प्रेग्नेंसी संदर्भात काही न्यूज पोर्टल्सनी बातम्यांमध्ये म्हटलं होतं की,आलिया लंडनमध्ये हॉलीवूड सिनेमाचं शूट करतेय तेव्हा आता तिला आणायला रणबीर तिकडे जाणार आहे. तसंच आलियानं आपली प्रेग्नेंसी अशी प्लॅन केलीय की तिच्या सिनेमाच्या शूटिंगवर याचा काही परिणाम होणार नाही. वगैरे..वगैरे...कालपासुन या बातम्यांचा नुसता धुरळा उडाला होता. पण आता आई बनणाऱ्या आलियानं या एकेका बातमीची चांगलीच खबर घेतली आहे.(Alia Bhatt slams Publication, post viral)

Alia Bhatt has slammed Publication,post viral

आलियानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत मीडियाला फटकारत लिहिलं आहे,''आपण अजूनही बुरसटलेल्या जुन्या विचारांना धरुन आहोत. आजही आपण जुन्या रुढी-परंपरा कुरवाळत बसले आहोत. मी एक स्त्री आहे,पार्सल नाही, मला न्यायला कोणी का येईल. मला आरामाची गरज नाही पण तुमचे विचार पाहता तुम्हाला एका चांगल्या डॉक्टरच्या ट्रिटमेंटची नक्कीच गरज आहे. हे कलयुग आहे,२०२२ सालात आहोत आपण. कृपया,बाहेर या जुन्या पद्धतीच्या विचारांतून. मला एकटीला सोडा,माझा शॉट रेडी आहे''. आलिया सध्या तिच्या हॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमातून ती हॉलीवडमध्ये पदार्पण करतेय. तिनं हॉलीवूड स्टार गल गडोतसोबतचा फोटो देखील सेटवरुन शेअर केला होता.

आलियानं प्रेग्नेंसीची बातमी शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. त्यानंतर आलियानं रणबीर कपूरसोबतचा एक Unseen फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार व्यक्त करणारा एक मेसेज शेअर केला होता. ती म्हणाली आहे,''आपण आम्हाला दिलेल्या प्रेमानं आम्ही कृतकृत्य झालो आहोत. मी प्रत्येकानं दिलेला शुभेच्छा संदेश वाचण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही आपल्या आशीर्वाद आणि प्रेमामुळेच आयुष्यातला हा आनंदाचा क्षण एन्जॉय करु शकत आहोत. तुम्हा प्रत्येकाचे मनापासून आभार''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT