Alia Bhat & Her GrandMother(Soni Rajdan's Mother) Google
मनोरंजन

Video:आलियाची ९३ वर्षीय आजी पाहिलीत का?या वयातही देतेय नातीला टक्कर

सोनी राजदान यांनी आपल्या सोशल मीडिया आलियाच्या आजीच्या वाढदिवसानिमित्तानं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकरी खूश

प्रणाली मोरे

आलियाच्या(Alia Bhatt) आजीला पाहिलंत का? पाहिलं नसेल तर आता पाहून घ्या,आलियासारखीच क्यूट,कूल,बिनधास्त आहे आलियाची आजी. १७ फेब्रुवारीला आलियाच्या आजीनं ९३ वर्ष पूर्ण करून ९४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्तानं सोनी राजदान यांनी आलियाच्या आजीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांनी आलियाच्या आजीच्या ९३ व्या वाढदिवसाच्या निमित्तानं शेअर केला आहे. त्या व्हिडीओ पोस्टला शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे,या बाईला कोणी थांबवू शकत नाही. सोनी राजदानचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पूजा भट्टने त्यावर प्रतिक्रिया नोंदवताना लिहिलं आहे की,''यांच्या उत्साहाला माझा सलाम''. त्याचबरोबर रिद्धिमा कपूर,अहाना कुमरा,अर्चना पुरन सिंह,ईशान खट्टर या सेलिब्रिटींनी देखील आलियाच्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या व्हिडीओत आलियाच्या आजीचा एक जिंदादील अंदाज पहायला मिळत आहे. खरंतर या वयात अनेकजण आयुष्याला कंटाळलेले,थकलेले पहायला मिळतात. पण आलीयाची आजी मात्र त्यांच्यापैकी एक आहे की जी आपलं आयुष्य आनंदात जगतेय,तिला वयाची फिकीर नाही,ना कुठली काळजी,ती देवानं दिलेलं सुंदर आयुष्य तितक्याच सुंदरपणे जगतेय. या व्हिडीओत त्या बेडवर आरामात बसल्या आहेत,ब्रेकफास्टचा आनंद घेतायत. म्हणजे एकीकडे चहाचा कप त्यांच्या हातात आहे,दुसरीकडे प्लेटमध्ये सॅंडवीच आहे आणि त्याचा आस्वाद घेता घेता छान गुणगुणतानाही दिसत आहेत. आलियाच्या आजीच्या या व्हिडीओनं पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र हसू उमटवलं आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आलिया भटच्या आजीच्या या उत्साहाला सलाम तर करायलाच हवा. आणि बिलेटेड हॅप्पी बर्थ डे देखील!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT