मनोरंजन

कन्यादान नव्हे कन्यामान! आलियाच्या जाहिरातीवरुन वाद का?

आलियाची ही नवी जाहिरात तुम्ही पाहिलीत का?

स्वाती वेमूल

अभिनेत्री आलिया भट्टच्या Alia Bhatt एका जाहिरातीवरून नवा वाद सुरू झाला आहे. 'मोहे' Mohey या ब्रायडल वेअर ब्रँडसाठी आलियाने ही जाहिरात केली असून त्यात उपस्थित केलेल्या कन्यादानाच्या प्रश्नावरून हा वाद निर्माण झाला आहे. काहींनी जाहिरातीमधील नव्या संकल्पनेचं कौतुक केलं आहे. तर काहींनी त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे. जाहिरातीचा विरोध करणाऱ्यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप करत आलियावर निशाणा साधला आहे. (Alia Bhatt ad controversy)

जाहिरातीत नेमकं काय दाखवलं आहे?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या जाहिरातीच्या व्हिडीओत आलिया लग्नमंडपात वधूच्या पोशाखामध्ये बसलेली दिसत आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तिच्यावर किती प्रेम करतो, हे ती सांगत असते. हेच सांगताना ती कन्यादानसंदर्भात प्रश्न उपस्थित करते. "मुलीला परकं धन का म्हटलं जातं? मुली दान करण्याची गोष्ट आहे का? कन्यादान का? त्याऐवजी नवी कल्पना आत्मसात करूया, कन्यामान!" असं ती व्हिडीओच्या शेवटी म्हणते.

आलियाची ही जाहिराती काहींना आवडली. पण काहींना तिने मांडलेले विचार मात्र पटलेले नाहीत. सोशल मीडियावर अनेकांनी आलियावर टीका केली आहे. आलियाने हिंदू धर्माचा अपमान केला, असं काहींनी म्हटलंय. तर प्रत्येक वेळी फक्त हिंदू परंपरांनाच का लक्ष्य केलं जातं असा सवाल काहींनी विचारला आहे. आलिया आणि तिने जाहिरात केलेल्या या ब्रँडवर बंदी आणण्याचीही मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. एकीकडे ट्रिपल तलाकसारख्या प्रथांबद्दल पुरेशी जागरुकता केली जात नाही. पण हिंदू परंपरांबद्दल खूप बोललं जातं, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.

या सर्व वादावर अद्याप आलिया किंवा मोहे ब्रँडने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आलिया गेल्या काही वर्षांपासून या ब्रँडशी जोडली गेली आहे. तिने याआधीही या ब्रँडसाठी जाहिराती केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

SCROLL FOR NEXT