Alias new home price just only 32 core Gauri khan interior decorator  
मनोरंजन

शाहरुखच्या गौरीनं केलं अलियाच्या घराचं इंटेरियर; किंमत फक्त 32 कोटी

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री अलियानं नव्यानं घर खरेदी केली आहे. या घराची किंमत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. अलियानं रणवीर कपूरच्याच इमारतीमध्ये एक महागडे घर घेतले आहे. ज्याची किंमत ऐकल्यास आपली झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. अलिया आणि रणवीरमध्ये वाढलेली जवळीक ही त्या नव्या घरामागील एक महत्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अलिया आणि रणवीर हे एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्याविषयी सोशल मीडियावर बरचं काही बोललं जात आहे. कोरोनाच्या काळात असलेल्या लॉकडाऊनच्या निमित्तानं दोघांनी बराच काळ एकत्र घालवल्याचे दिसून आले आहे. ती जवळीक अधिक घट्ट व्हावी यासाठी अलियानं तर घर घेतलं नाही ना, अशा प्रकारची मिश्किल टिप्पणी नेटकरी करत आहेत. पिंकव्हीलानं दिलेल्या एका वृत्तात आलियाच्या नव्या घराचा उल्लेख आला आहे. अलियाने रणबीरच्याच इमारतीत एक अपार्टमेंट खरेदी केलं आहे. रणबीर या इमारतीत 7 व्या मजल्यावर राहतो. तर,आता आलिया याच इमारतीत 5 व्या मजल्यावर राहणार आहे. आलियाचं नवीन घर 2460 स्क्वेअर फूटांचं असून त्याची किंमत मोठी आहे.

आलियाने तिचं हे नवीन घर सजवण्याची जबाबदारी शाहरुख खानची पत्नी व इंटेरिअर डिझायनर गौरी खान हिच्यावर सोपवल्याचं सांगण्यात येत आहे. आलियाने या नव्या घरात लक्ष्मीपूजन केलं असून यावेळी तिचे कुटुंबीय, रणबीर कपूर, करण जोहर, अयान मुखर्जी यावेळी हजर होते. जुहूमध्येही आलियाचं एक घर आहे. त्याची किंमत 13.11 कोटी रुपये आहे. आलियाच्या नव्या घराची किंमत 32 कोटी रुपये आहे.   संपूर्ण इमारत 12 मजल्यांची आहे.  सध्या आलिया तिच्या बहिणीसोबत जुहूमध्ये राहते. 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर  बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असून त्यांच्या कुटुंबीयांचीदेखील या नात्याला परवानगी असल्याचं सांगण्यात येतं आहे. लॉकडाउनच्या काळातदेखील या जोडीने त्यांचा बराचसा वेळ एकमेकांसोबत व्यतीत केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT