All Is Not Well Between Actor Siddharth Jadhav's married life? Google
मनोरंजन

सिद्धार्थ जाधवचं वैवाहिक आयुष्य अडचणीत? 'त्या' इन्स्टा पोस्टने चर्चेला उधाण

सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती अक्कलवार यांचे लग्न २००७ साली झालं असून,त्यांना दोन मुली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सेलिब्रिटींचे अफेअर्स,विवाह सोहळे जेवढे गाजतात,किंबहुना त्याहून अधिक गाजतात त्यांचे घटस्फोट(Divorce). सिनेइंडस्ट्रीत तर असे घटस्फोट समोर आले आहेत की त्यामुळे चाहत्यांना अनेकदा धक्का बसला आहे. 'कालपरवा पर्यंत यांच्यात सगळं गोड होतं मग आता असं अचानक झालं तरी काय?' असा प्रश्न एका सामान्य चाहत्याला सतावू लागतो. नेहमीच बॉलीवूडमध्ये घटस्फोट जास्त होतात असं आपण म्हणत आलोय पण आता तिथलं वारं मराठी इंडस्ट्रीलाही लागलंच. बातमी कानावर पडतेय की आपल्या सर्वांचा मराठीतला लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव(Siddharth Jadhav) याच्या वैवाहिक आयुष्यात(Married Life) काहीतरी बिनसलंय,गेले काही दिवस तो आपली पत्नी तृ्प्ती आणि दोन मुली यांच्यासोबत राहत नाही. आता ही कानावर पडलेली बातमी पण त्यात तथ्य शोधायला गेलं तर काही गोष्टी समोर आल्यात ज्या पाहून सूत्रांनी दिलेल्या सिद्धार्थ विषयीच्या बातमीवर आपसूक विश्वास बसतो.(All Is Not Well Between Actor Siddharth Jadhav's married life?)

सिद्धार्थ जाधवच्या जवळच्या माहितीतील सूत्रांकडून कळालंय की, गेले दोन वर्ष सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्यात खटके उडत होते. गेल्या काही दिवसांपासून ते एकत्र राहत नाहीत. त्याच्या दोन मुली त्याच्या पत्नीसोबत राहत आहेत. दोघांमधलं वादाचं कारण मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. दोघंही विभक्त होण्याच्या मार्गावर मात्र आहेत असं सूत्रांनी सांगितलं आहे. सध्या हे दोघं दुबईत आपल्या मुलींसोबत हॉलिडेसाठी गेले आहेत. पण दोघांचं इन्स्टा चेक केलं तर दुबईतील पोस्ट केलेल्या फोटोत दोघांचा एकमेकांसोबतचा एकही फोटो नाही. आजकाल अनेक सेलिब्रिटी विभक्त झाले तरी मुलांसाठी एकत्र डिनरला जातात,हॉलिडेवर देखील जातात. तसंच,सिद्धार्थ आणि तृप्ती मुलींना घेऊन दुबईत गेले आहेत असं देखील सूत्रांनी सांगितलं आहे.

सिद्धार्थ आणि तृप्ती यांचे लग्न २००७ मध्ये झालं होतं. त्यांना दोन गोड मुली देखील आहेत. त्या दोघांची लव्हस्टोरी तर भन्नाट आहे, सिद्धार्थ अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करत असताना त्यानं पत्रकार असलेल्या तृप्तीला प्रपोज केलं. पण तृप्तीनंही अगदी वेळ घेऊन त्याला होकार दिला. 'नच बलिये' मध्ये दोघांनी घेतलेल्या सहभागानंतर त्यांच्यातील लव्ह बॉन्ड चाहत्यांपर्यंत पोहोचलं होतं. अनेक फिल्मी कार्यक्रमातून त्यांच्यातलं गोड नातं समोर आलं आहे. पण अचानक कुठे,काय,कसं बिनसलं कुणास ठाऊक की सिद्धार्थच्या सुखी संसाराला नजर लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Women: मला न कळवता तीने गोवा सोडलं... गोकर्ण जंगलाच्या गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेचा पती प्रथमच समोर, धक्कादायक माहिती

Bokaro Naxal Encounter : २५ लाखाचं बक्षीस असलेला नक्षलवादी ठार! सुरक्षा दल-नक्षलवाद्यांत तीव्र गोळीबार; कोब्रा बटालियनचा जवानही शहीद

Nagpur News : विद्यार्थी नसलेल्या तीनशे महाविद्यालयांना वेतनासाठी कोट्यवधींचे अनुदान; जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश

Mahadev Munde Case: आरोपींना अटक नाहीच, Dnyaneshwari Munde यांनी उचललं टोकाचं पाऊल | Beed News

Nagpur Rain : पूर नुकसानीचा अहवाल थंडबस्त्यातच; नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदतीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT