allu arjun  Sakal
मनोरंजन

Allu Arjun Birthday: कुटुंबीयांनी दिला होता लग्नाला नकार पण...; जाणून घ्या अभिनेत्याबद्दल या खास गोष्टी

आज अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

साउथचा अभिनेता अल्लू अर्जुनला त्याचे चाहतेही स्टायलिश स्टार म्हणतात. दिसण्यापासून अभिनयापर्यंत तो मोठ्या स्टार्सना टक्कर देतो. अल्लूचे स्टारडम केवळ दक्षिणेपुरते मर्यादित नाही, तर त्याचे चाहते देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहेत. आज साऊथ स्टारच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.

या अभिनेत्याचा जन्म 8 एप्रिल 1982 रोजी मद्रासमधील तामिळ कुटुंबात झाला. अगदी लहान वयातच त्याने कॅमेरासमोर आपली कामगिरी दाखवायला सुरुवात केली. तीन वर्षांचा असताना त्याने पहिल्यांदा कॅमेऱ्याचा सामना केला. त्यानंतर 'विनर' आणि 'डॅडी'मध्ये बालकलाकार म्हणून काम केले. अल्लूला त्याच्या करिअरमधील पहिला मोठा ब्रेक 'गंगोत्री' चित्रपटातून मिळाला. या चित्रपटाद्वारे त्याने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले.

2004 हे वर्ष त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्याच वर्षी त्याचा 'आर्या' हा चित्रपट आला, जो प्रेक्षकांना खूप आवडला. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने अल्लूला यशाच्या शिखरावर नेले. आपल्या दमदार अभिनयाने या अभिनेत्याने या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार पटकावले.

या चित्रपटानंतर अल्लूने मागे वळून पाहिले नाही आणि यशाच्या पायऱ्या चढत राहिला. अल्लू अर्जुनने आपल्या अभिनयाच्या जोरावर आतापर्यंत अनेक पुरस्कार जिंकले आहेत. पाच फिल्मफेअरशिवाय त्याला पाच वेळा नंदी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

अल्लू अर्जुनमध्ये ते सर्व गुण आहेत, जे खऱ्या अर्थाने सुपरस्टार असायला हवेत. धमाकेदार अॅक्शनसह त्याला लोकांना कसे हसवायचे हे देखील त्याला माहित आहे. याशिवाय तो एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे. तो अनेकदा आपल्या डान्स स्टेप्सने लोकांना चकित करतो. अभिनेत्याचे गायनही उत्कृष्ट आहे. 2016 मध्ये त्याने 'सर्राइनोडु'मध्ये गाऊन रसिकांना खास भेट दिली होती. त्याचे हे गाणे खूप आवडले होते.

अल्लूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, अभिनेत्याने स्नेहा रेड्डीशी लग्न केले. जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर, त्याने स्नेहाला पहिल्यांदा मित्राच्या लग्नात पाहिले आणि तो तिच्या प्रेमात पडला. असे म्हटले जाते की जेव्हा ती मास्टर्स पूर्ण करून अमेरिकेतून परतली तेव्हा अल्लूने तिला लग्नासाठी विचारले, परंतु स्नेहाच्या वडिलांनी नकार दिला. मात्र, नंतर लग्नाला होकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT