Allu Arjun(Pushpa-TheRise Actor), Sanjay Leela Bhansali(Gangubai Kathiawadi DIrector) together for new project? Google
मनोरंजन

ठरलं! 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनचा पहिला बॉलीवूड सिनेमा भन्साळींसोबत

अल्लुअर्जुन लवकरच बॉलीवूड एन्ट्री करणार अशी चर्चा 'पुष्पा-द राईज' सिनेमानंतर रंगली होती.

प्रणाली मोरे

'पुष्पा'(Pushpa-The Rise) स्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)ला बॉलीवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी(Sanjay Leela Bhansali) यांच्या आफिसला भेट देताना पाहिलं गेल्यामुळे सध्या एका चर्चेला जोरदार सुरुवात झाली आहे. अंदाज लावले जातायत की अल्लू अर्जुन लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात दिसेल. 'पु्ष्पा' सिनेमा हिंदीतही डब करून प्रदर्शित केला गेला आणि अल्लूच्या हिंदी चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली. भारतातच नाही तर जगभरातनं 'पुष्पा' सिनेमाचे,त्यातील अल्लू अर्जुननं साकारलेल्या भूमिकेचे लोक वेडे झाले. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यत सर्वांनीच 'पुष्पा' सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग आणि डान्स स्टेप्सच्या व्हिडीओ रील सोशल मीडियावर आपापल्या अंदाजात पोस्ट केल्या.

मुंबईतही 'पुष्पा' सिनेमाच्या प्रमोशन कार्यक्रमा निमित्तानं अल्लूनं हिंदी भाषा बोलायचा केलेला प्रयत्न चाहत्यांची मनं जिंकून गेला. तेव्हाच अर्जुननं बॉलीवूडमधील आपल्या एन्ट्रीची नकळत पुसटशी कल्पना दिली होती. पण आता अचानक संजय लीला भन्साळींच्या ऑफिसमध्ये त्यानं दिलेल्या व्हिझिटमुळे तो लवकरच बॉलीवूड प्रोजेक्ट करणार अशी चर्चा जोरदार रंगलीय. तो मुंबईतील प्रायव्हेट एअरपोर्टवर पाहिला गेला आणि तिथनं त्यानं थेट 'गंगूबाई काठियावाडी' दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचं ऑफिस गाठलेलं कॅमेऱ्याच्या नजरेतनं सुटलं नाही. काळ्या रंगाच्या पेहरावात,डोळ्यावर स्मार्ट गॉगल लावलेला अल्लू नेहमीप्रमाणेच कूल दिसत होता.

'पुष्पा' सिनेमातील अल्लू अर्जुनची सहकलाकार रश्मिका मंदाना लवकरच बॉलीवूडच्या 'मिशन मजनू' सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे तिच्या मागोमाग आता अल्लू अर्जुनही बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसला तर नवल नव्हे. शेवटी साऊथचा सुपरस्टार आहे तो. सध्या अल्लू 'पुष्पा'च्या सीक्वेलमध्ये बिझी आहे. सीक्वेलमध्येही अल्लू अर्जुन,रश्मिका मंदाना,धनंजया,फहाध फासिल असे कलाकार असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Crime: प्रेमाच्या आड आलेला पती ठार! कोरपना तालुक्यात धक्कादायक हत्या

Dombivli Kalyan Politics:'डोंबिवली कल्याणचा राजकीय पट बदलतोय'; वैर संपतंय, हितगुज वाढतेय; नवी समीकरण जुळतायत..

Latest Marathi Breaking News : बीडमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये राडा...

अबोली फेम सचित पाटीलची निर्माता म्हणून नवी इनिंग ! असंभव सिनेमाबद्दल म्हणाला..

Mangalwedha Municipal Elections: 'मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी 19 अर्ज तर नगरसेवकासाठी 160'; निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांची माहिती

SCROLL FOR NEXT