Pushpa 2 sakal
मनोरंजन

Pushpa 2 Video: अत् पुष्पा येकडा? अरे तो पुष्पा कुठंय.....व्हिडिओचा तुफान राडा!

Vaishali Patil

Pushpa-The Rule First Video: अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. चाहते या चित्रपटाविषयी अपडेट जाणुन घेण्यासाठीही उत्सुक असतात. अशा परिस्थितीत या चित्रपटासंबधित एक नवीन अपडेट समोर आली आहे, जे चाहत्यांचा आनंद द्विगुणित करणार आहे.

सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या पुष्पाने बॉक्स ऑफिसवर असा खळबळ उडवून दिली की सर्व रेकॉर्ड मोडले गेले. पुष्पाच्या यशानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाच्या सिक्वेलची उत्सुकता आहे.

आता हा उत्साह पाहून निर्मात्यांनी पुष्पा: द रुलचा पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर रिलीज केला आहे. पुष्पाच्या सिक्वेलचा पहिला व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर काही मिनिटांतच इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

पुष्पाच्या सिक्वेलचा पहिला व्हिडिओ निर्मात्यांनी अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 4.05 वाजता द हंट बिफोर द रुल रिव्हल.

पुष्पा द रुलच्या पहिल्या २० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुनची झलक पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पुष्पा तिरुपती तुरुंगातून पळून गेला आहे आणि तो आता कुठे आहे, हे 7 एप्रिलला दुपारी 4 वाजता कळेल. सोशल मीडियावर पुष्पा 2 च्या या व्हिडिओने चाहत्यांनी एकच जल्लोष केला आहे.

Pushpa 2

सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट पुष्पा २ चा टीझर ७ एप्रिल रोजी रिलिज करण्यात येणार आहे. कारण या दिवशी अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. 'पुष्पा 2 द रुल' चे नुकतेच विशाखापट्टणममध्ये शूटिंग पूर्ण केले ज्यामध्ये त्यांनी बरेच अॅक्शन सीक्वेन्स शूट केले आहेत. अल्लू अर्जुन, रश्मीका मंदाना, फहाद फाझील असे कलाकार पुष्पा 2 द रुल मध्ये दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT