Allu Arjun Pushpa 2 Instagram
मनोरंजन

Pushpa 2 चं रिलीज लांबणीवर पडण्याची शक्यता..'या' कारणानं तातडीनं थांबवलंय शूटिंग

2023 मध्ये 'पुष्पा 2' रिलीज होणार म्हणून चाहत्यांमध्ये उत्सुकता पहायला मिळाली होती.

प्रणाली मोरे

Allu Arjun Pushpa 2: अल्लू अर्जून अभिनित 'पुष्पा 2' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. सिनेमाशी संबंधित छोट्यातील छोट्या अपडेटविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येतेय. 'पुष्पा' सिनेमा हिट झाल्यानंतर नेहमी ट्वीटरवर 'पुष्पा 2' चं हॅशटॅग ट्रेन्ड होताना दिसत आहे.

यादरम्यान आता बातमी आली आहे की ज्यामुळे चाहते नाराज होऊ शकतात. पुष्पा डिसेंबर 2021 मध्ये रिलीज होणार होता. याचा सीक्वेल यावर्षाच्या शेवटी पूर्ण होईल असं बोललं जात होतं पण आता अचानक सिनेमाचं रिलीज लांबणीवर पडणार असं बोललं जात आहे.

अशामध्ये सिनेमा आता 2024 लाच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.(Allu Arjun Pushpa 2 release postpone, shooting stopped due to this reason)

पुष्पा सिनेमात अल्लू अर्जुन,रश्मिका मंदाना आणि फहाद फसील मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तसंच समंथानं 'ओ अंटावा' हे आयटम नंबर केलं होतं जे तुफान गाजलं होतं. या सिनेमाला सुकुमारनं दिग्दर्शित केलं होतं.

सिनेमाचा पहिला भाग हिट झाला त्यामुळे आता सीक्वेलवर देखील टीम जोरदार मेहनत घेताना दिसत आहे आणि कोणतीच कसर त्यांना यावेळी सोडायची नाहीय. तसंच,आधीच्या सिनेमापेक्षा सीक्वेल खूप भव्य-दिव्य असेल असं बोललं जात आहे.

बॉलीवूड लाईफच्या रिपोर्टनुसार,सिनेमाचं शूटिंग काही महिने आधीच सुरू झालं होतं पण मेकर्सनी सिनेमाचा छोटासा भागच शूट केला आहे. त्यानंतर शूटिंग झालंच नाही आणि त्याविषयी काही अपडेटही आलेलं नाही की पुन्हा शूट कधी सुरू होणार.

सुकुमार सध्या पुष्पा 2 च्या टीजरमध्ये व्यस्त आहेत,जो अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी रिलीज केला जाईल. रिपोर्टमध्ये सूत्रांनी सांगितल्यानुसार सुकुमार सिनेमाच्या कथेविषयी समाधानी नाही. त्या शूट केलेल्या सिनेमातील काही भाग त्याला पुन्हा शूट करायचा आहे.

आणि जर असं झालं तर 'पुष्पा 2' च्या टीमजवळ सिनेमाच्या शूटपासून तो रिलीज करेपर्यंत फार वेळ हातात राहणार नाही. याचा अर्थ असाच होतो की रिलीजसाठी आता आणखी थोडी वाट पहावी लागणार. कदाचित सिनेमा पुढील वर्षी रिलीज केला जाऊ शकतो. यादरम्यान 'पुष्पा 2' मधील कलाकार इतर प्रोजेक्टमध्ये बिझी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT