Allu Arjun starrer Pushpa 2 The Rule is the most awaited Hindi film check out the list  
मनोरंजन

Most Awaited Films: रिलिजपुर्वीच पुष्पानं सलमान अन् शाहरुखला टाकलं मागे! जाणुन घ्या नेमकं काय आहे कारण

Vaishali Patil

सध्या मनोरंजन विश्वात बॉलिवूड व्हर्सेस टॉलिवूड असं काहीसं चित्र दिसत आहे. प्रेक्षक सध्या साउथ चित्रपटांना पसंती देत आहेत. साउथने यंदा अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. ज्यात बाहूबली, केजीएफ, कांतारा आणि पुष्पा अशा अनेक चित्रपटांच्या सामावेश आहे. तर बॉलिवूडमध्ये पाहिलं असता पठाण व्यतिरिक्त इतर चित्रपटांचे कलेक्शन काही खास नाही.

2023 मध्ये देखील बॉलीवूड आणि टॉलिवूड हे अनेक चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत. दोघांमध्ये चांगलाच सामना रंगणार आहे असं दिसत आहे. ऐकीकडे सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, तर चाहते त्याच्या 'टायगर 3' चीही वाट पाहत आहेत. तर टॉलिवूडमध्ये प्रेक्षक कांतारा 2, केजीएफ च्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पहात आहेत.

आता या सगळ्यामध्ये ऑरमॅक्स मीडियाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढविणाऱ्या 'मोस्ट अवेटेड फिल्म्स' ची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये साउथस्टार अल्लू अर्जुनने बाजी मारली आहे. त्याने बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांना मागे टाकलं आहे. ormax मोस्ट अवेटेड फिल्म 2023 च्या यादीतील चित्रपटांची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

विश्वसनीय मीडिया पोर्टल Ormax Media ने सोशल मीडियावर 15 एप्रिल 2023 पर्यंत बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपटांची यादी शेअर केली आहे. ज्यात सलमान खान, शाहरुख खान, कार्तिक आर्यन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचा सामावेश आहे. ज्यांचे ट्रेलरही अद्याप प्रदर्शित झालेले नाहीत.

Pushpa 2

पुष्पा 2:

'पुष्पा 2: द रुल' ऑरमॅक्स मीडियाच्या बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर हा पॅन इंडिया चित्रपट असेल आणि त्याची हिंदी व्हर्जन या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट मानला जातं आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझरही रिलिज झाला आहे. त्याचबरोबर पुष्पाच्या पोस्टर पाहिल्यानंतर तर प्रेक्षकांची उत्सूकता अधिकच वाढली आहे.

hera pheri 3

हेरा फेरी 3 आणि जवान

या यादीत दुसऱ्या नंबरवर अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा आयकॉनिक कॉमेडी चित्रपट 'हेरा फेरी' या चित्रपटाचा तिसरा भाग आहे. हेरा फेरी 3 या चित्रपटाची प्रेक्षक प्रतिक्षा करत आहेत. त्याचबरोबर 'पठाण'च्या यशानंतर शाहरुख खानच्या आगामी चित्रपट 'जवान' याची देखील आतुरतेने वाट पाहत आहे. शाहरुखचा हा दुसरा अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. अॅटली हा चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Salman And Katrina movie Tiger 3

टायगर 3

सलमान खानचा 'टायगर 3' देखील Ormax मीडियाच्या मोस्ट अवेटेड हिंदी चित्रपटांच्या तिसऱ्या स्थानावर आहे. 'पठाण' नंतर फ्रँचायझीचा हा तिसरा आणि यशराज फिल्म्सच्या स्पायच्या दुनियेतील दुसरा चित्रपट आहे. 'टायगर 3'मध्ये सलमान खानसोबत कतरिना कैफही मुख्य भूमिकेत आहे .

Bhool Bhulaiyaa 3

भूल भुलैया 3

कार्तिक आर्यनने 'भूल भुलैया 2' हा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. आता चाहते 'भूल भुलैया 3' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हॉरर कॉमेडी चित्रपट ऑरमॅक्स मीडियाच्या यादीत या वर्षातील सर्वात प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT