Ekta Kapoor Ban  Esakal
मनोरंजन

Ekta Kapoor Ban: कमळाच्या फूलात 'गंदी बात'! माता लक्ष्मीचा झाला अपमान...

Vaishali Patil

गेल्या अनेक दिवसापासून मनोरंजन विश्वात असे काही विषय सुरु आहेत ज्यामुळे कुठल्या तरी वादाला सुरु होते.

सातत्याने मनोरंजन विश्वातील काही चित्रपट, सिरिज, मालिका यामध्ये हिंदू धर्माचा अपमान करण्यात येतो असा आरोपही अनेक वेळा सिने सृष्टीवर होतात.

मग ते दिपिकाची पठाण मधील भगवी बिकीनी असो किंवा तापसीचा तो नेकलेस...यात आता आणखी एका वादाची ठिणगी पडली आहे.

या वादाच कारण ठरली आहे ती एकता कपूरच्या Alt बालाजीची सिरिज गंदी बातचे नवे पोस्टर..Alt बालाजीच्या वादग्रस्त पोस्टरने सध्या खळबळ उडवून दिली आहे.

पोस्टरमध्ये देवी लक्ष्मीसारखी महिला कमळाच्या फुलांसह दिसत आहे. हे पोस्टर 'गंदी बात'च्या सीझन 6 चे आहे.

या पोस्टरमध्ये एक महिला कमळाच्या फुलासह अतिशय मोहक अवतारात दाखवण्यात आली आहे.

या पोस्टरमध्ये महिलेच्या डोक्याचा अर्धा भाग पदराने झाकलेला आहे, परंतु कंबरेचा भाग दिसत आहे.

कामुक कथा दाखवणाऱ्या 'गंदी बात' शोच्या या पोस्टरवर लोकांनी आक्षेप घेतला आहे. नेटकऱ्यांना हे पोस्टर अजिबात आवडले नाही आणि त्यांनी यावर सातत्याने आक्षेप घेत आहेत.

ट्विटवर #ektakapoor serials आणि #EktaKapoorShouldApologize असे हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

या पोस्टरद्वारे एकता कपूर आणि त्याच्या टिमनं हिंदू धार्मियांच्या भावना दुखावल्या आहेत आणि देवी लक्ष्मीची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सोशल मीडिया यूजर्स करत आहेत.

तथापि, एक सत्य हे देखील आहे की 'गांडी बात 6' चे पोस्टर ज्यासाठी लोक खूप वादळ निर्माण करत आहेत ते 2021 मध्ये वेबकास्ट केले गेले आहे आणि या मालिकेचा 7 वा सीझन देखील यावर्षी 25 फेब्रुवारीपासून आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT