amar photo studio marathi drama will be closed soon know the latest update sunil barve shared emotional post sakal
मनोरंजन

Sunil Barve: 'अमर फोटो स्टुडिओ' घेणार प्रेक्षकांचा निरोप; सुनील बर्वे यांची भावूक पोस्ट..

'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकाने रंगभूमीवर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

नीलेश अडसूळ

Amar Photo Studio: अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे या जोडीने 'दिन दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. तरुणांची ही दोस्ती यारी घराघरात पोहोचली आणि गाजलीही. त्यानंतर या भन्नाट कलाकारांनी लगेचच मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं आणि प्रेक्षकांना एक दर्जेदार नाट्य मेजवानी दिली.

'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकातून हे कलाकार पुन्हा भेटीला आले आणि एक वेगळा विषयही मराठी रंगभूमीवर आला. या नाटकाला प्रेक्षकांच प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण आता हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या नाटकाचे निर्माते होते अभिनेते सुनील बर्वे. आता नाटक बंद होणार असल्याने त्यांनी एक भावनिक पोस्ट शेयर केली आहे.

(amar photo studio marathi drama will be closed soon know the latest update sunil barve shared emotional post)

नाटकातील एक व्हिडिओ शेयर करत सुनील बर्वे म्हणतात, 'काल ‘अमर फोटो स्टुडिओ’ ह्या आमच्या नाटकाचा बोरिवलीतील शेवटचा प्रयोग होता, तसाच तो पर्ण पेठेचा ही शेवटचा प्रयोग होता. सखी शिकायला परदेशी गेल्यानंतर पर्ण प्रयोग करायला लागली, सखी परत आल्यावर दोघी आलटून पालटून प्रयोग करत राहिल्या.'

'नंतर आठ नऊ महिने प्रयोगच झाले नाहीत, दरम्यान पर्णने चारचौघी नाटक घेतलं, आणि ते धुंवाधार चालू लागलं. अमर… चे शेवटचे काही प्रयोग करायचे ठरवल्यावर तिला प्रयोग करणं शक्य होत नव्हतं म्हणून आम्हाला सगळ्यांनाच वाईट वाटंत होतं, पण as luck would have it कालचा प्रयोग करणं तिला शक्य झालं आणि तो तिचा अमर फोटो स्टुडिओ चा शेवटचा प्रयोग ठरला.'

हेही वाचा : Types of Vedas: वेदांचे प्रकार

पुढे ते म्हणतात, ''सखी ऐवजी ती प्रयोग करण्याचं ठरलं तेव्हासुद्धा आम्ही तीचं स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतिने केलं, म्हणूनच तिच्या शेवटच्या प्रयोगाला सुद्धा आगळे वेगळेपणा टिकवून ठेवला!''

''पर्ण, काल तू आम्हा सगळ्यांचे आभार मानलेस, तेव्हा भरून आलं होतं. पण मी सुबक आणि कलाकारखाना च्या टीमच्या वतीने तुझे मनापासून आभार मानतो!! सखी परदेशी जाण्याचा विचार करत होती तेव्हा अमर.. ऐन बहरात होतं. ते पुढे कसं न्यायचं हा आमच्या समोरचा प्रश्न तू सोडवलास, आणि प्रयोगांची घोडदौड देशात-परदेशातही तशीच चालू ठेवलीस. तू एक उत्तम कलाकार आहेसंच, पण एक सहृदयी माणूस सुद्धा आहेस हे जाणवलं! तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या व अपर्णा कडून आणि अमर.. च्या संपूर्ण टीम कडून अनेक अनेक शुभेच्छा!!!'' अशा शब्दात सुनील बर्वे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT