Ameesha Patel  esakal
मनोरंजन

Ameesha Patel : 'बाकीच्या अभिनेत्री माझ्यावर जळायच्या, त्यांच्यात सगळ्यात जास्त मी शिकलेली'!

अमिषा पटेलचा आगामी काळात गदर २ नावाचा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्तानं तिच्या नावाची जोरदार चर्चा असल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Ameesha Patel claims people get jealous films used to be taken away : अमिषा पटेलचा आगामी काळात गदर २ नावाचा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्तानं तिच्या नावाची जोरदार चर्चा असल्याचे दिसून आले आहे. बऱ्याच मोठ्या प्रतिक्षेनंतर गदर चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात अभिनेत्री अमिषा पटेल चर्चेत आली आहे.

अमिषानं २००० मध्ये राकेश रोशन यांच्या कहो ना प्यार है नावाच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच लोकप्रिय झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी बरेचसे पुरस्कार देखील या चित्रपटाच्या वाट्याला आले होते. बॉलीवूडला ऋतिक नावाचा मेगास्टार मिळाला होता. अमिषाला देखील या चित्रपटानंतर अनेक बिग बजेट चित्रपट मिळाले होते. आता अमिषा तिच्या एका मुलाखतीनंतर चर्चेत आली आहे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

माझी जेव्हा बॉलीवूडमध्ये इंट्री झाली तेव्हा प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर, अभिषेक बच्चन, ईशा देओल आणि अनेक कुटूंबातील स्टार व्यक्ती होत्या. असे अमिषानं म्हटले आहे. बॉलीवूडच्या कुटूंबातील त्या माणसांनी नेहमीच आपला प्रभाव टिकून राहावा यासाठी प्रयत्न केले. बॉलीवूडमध्ये स्टारडम, स्टारकिड याविषयी काय काय बोलले जाते हे सगळ्यांना माहिती आहे. मलाही याचा सामना करावा लागला. हे सांगावेसे वाटते.

बॉलीवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मी आणि माझे काम याच्याशी प्रामाणिक होते. मी कुणाबद्दलही गॉसिपिंग करत नसे. त्यामुळे कुणासोबत विनाकारण मैत्री हा काही माझ्या स्वभावाचा भागही नव्हता. मी जेव्हा या क्षेत्रात आले होते तेव्हा माझ्याबरोबर अनेक कलावंतांची मुलं होती. हे सांगावेसे वाटते. मला कोणत्याही प्रकारे कलेचा वारसा नव्हता की कुणाचा मोठा पाठींबाही नव्हता. बऱ्याच व्यक्ती अशा होत्या की त्या माझा द्वेष करायच्या.

मी सेटवर देखील पुस्तके वाचत असायची. त्यामुळे नावं ठेवली जात, मी स्वताला खूपच शहाणी समजते. फारच पुस्तकी आहे. अशा प्रतिक्रिया यावेळी मला मिळायच्या. पण मला कुणाशी विनाकारण बोलणे आवडत नसायचे. कुणाविषयी काहीही बडबडायला आवडत नसायचे. त्यामुळे मला गर्विष्ठ असेही म्हटले जायचे. अशी प्रतिक्रिया अमिषानं दिली आहे. काही अभिनेत्रीही माझा द्वेष करायच्या. कुणाची नावं सांगून मला वाद निर्माण करायचा नाही.

कहो ना प्यार है नंतर अमिषाचा गदर एक प्रेम कथा हा चित्रपट आला होता. नंतर पवन कल्याण सोबत ती बद्रीमध्ये देखील दिसली होती. त्यानंतर अमिषाची लोकप्रियता कमी झाली होती. माझ्यावर जळणाऱ्या कित्येक अभिनेत्रींनी मला चित्रपट मिळू दिले नाही. त्यांना माहिती होते की, माझ्यामागे कुणीही गॉडफादर नाही. त्याचा त्यांनी फायदा घेतला. अशी प्रतिक्रियाही अमिषानं दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s World Cup Final : आधी पराभव बघितले...आता इतिहास घडवण्याची वेळ; फायनलसाठी तयार हरमन ब्रिगेड, किती वाजता सुरु होईल सामना?

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' बनवणाऱ्या महेश मांजरेकरांना महाराजांबद्दल विचारले ४ प्रश्न; काय दिली उत्तरं? तुम्ही ठरवा योग्य की अयोग्य

Mumbai: महिलेचा स्कर्ट ओढणे आणि शिट्टी वाजवणे हा गुन्हाच...! मुंबईतील न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीला सुनावली 'अशी' शिक्षा

Women’s World Cup Final : विश्वकप जिंकल्यास महिला क्रिकेटपटूंना मिळणार कोट्यवधींचं बक्षीस? नेमकी कुणी दिली ऑफर? वाचा...

Crime: स्वतःला देव समजणारा राक्षस! ३५० जणांना संपवलं, ११० अल्पवयीन मुलींचा समावेश, कारण... वाचा सर्वात कुख्यात सिरीयल किलरची कहाणी

SCROLL FOR NEXT