Amey Khopkar on Dhananjay Munde sakal
मनोरंजन

'तात्या विंचू', धनंजय मुंडेंचा 'मनसे' समाचार

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी धनंजय मुंडेंवर कठोर भाषेत टीका केली आहे. राज यांना अर्धवटराव म्हणणाऱ्या धनंजय मुंडे यांना अमेय खोपकर यांनी...

नीलेश अडसूळ

गेल्या काही दिवसात राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून गेले आहे. राजकारणाला धार्मिक रंग आल्याने राज्यातीलच नाही देशातील सामाजिक स्थिती अनास्थेची आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याची घोषणा करत हिंदुत्वाची कास धरली. त्या नंतर या घटनेला दिवसेंदिवस नवे राजकीय वळण मिळत आहे. (Amey Khopkar Tweet on Dhananjay Munde)

त्या नंतर राज ठाकरेंनी ठाणे येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती हल्ला केला.या हल्ल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. नुकतेच राष्ट्रवादीचेधनंजय मुंडे यांनी एका सभेत राज ठाकरे यांचा अर्धवटराव असा उल्लेख केला. 'भाजप विरुद्ध सीडी लावणारे अर्धवटराव ईडी आल्यांनतर गप्प झाले' असे विधान त्यांनी केले.

या विधानानंतर मनसे पक्षाकडूनही आरोपांची तोफ डागण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी धनंजय मुंडेंवर त्यांच्याच भाषेत टीका केली आहे. राज यांना अर्धवटराव म्हणणाऱ्या धनंजय मुंडे यांना अमेय खोपकर यांनी तात्या विंचू म्हंटले आहे. 'अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘अर्धवटराव’ म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’चा ओम फट स्वाहा करणार आहेत. राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार.' असे ट्विट खोपकर यांनी केली आहे.

हे ट्विट करताना त्यांनी महेश कोठारे यांच्या चित्रपटांच्या शीर्षकाचा वापर केला आहे. 'अर्धवटराव' आणि 'तात्या विंचू' ह देखील त्यांच्याच 'झपाटलेला' चित्रपटातील दोन पात्रे आहेत. यानिमित्ताने राजकीय वादात चित्रपटातील पात्रांनीही प्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT