Amey Vs Sumeet Raghwan esakal
मनोरंजन

Amey Vs Sumeet Raghwan: 'कोण किती पाण्यात बघुच उद्या!' अमेय- सुमितची जुंपली

सुरुवातील अमेयनं जंगलात राघू खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो. अशी पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली होती.

सकाळ डिजिटल टीम

Amey Wagh Vs Sumeet Raghwan: अभिनेता अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय. आज दिवसभर या दोन्ही अभिनेत्यांमधील वादानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु आहे हे मात्र नेटकऱ्यांना समजलेलं नाही. अनेकांना हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटते आहे तर अनेकांना सुमित आणि अमेयमधील पूर्वीचा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. यासगळ्यावर पुन्हा एकदा अमेयनं एक पोस्ट केली आहे. त्यातून त्यानं आता थेट सुमित राघवन यांना आव्हान दिले आहे.

सुरुवातीला अमेयनं जंगलात राघू खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो. अशी पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली होती. त्यावरुन सुमितनं त्याला प्रत्युत्त दिलं होतं. तो म्हणाला, सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतं. कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही. याचीही कृपया नोंद घ्यावी. असे सुमितने म्हटले होते. सध्याच्या घडीला आघाडीचा अभिनेता म्हणूनही त्याला ओळखले जाते. सोशल मीडियावर अमेय हा नेहमीच अॅक्टिव्ह असतो. चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्याला फॉलो करणारा चाहतावर्गही मोठा आहे. सध्या अमेय हा त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणून अमेय वाघचे नाव घेता येईल. त्यानं अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. अमेयनं पुन्हा सुमितला उत्तर दिले होते. तो म्हणाला वाघ कुठलाही का असेना शेवटी त्याच्या डरकाळीची दखल घेतलेली दिसतेय. यानंतर पुन्हा अमेयनं कोण किती पाण्यात आहे ते बघुच ना उद्या संध्याकाळी असे म्हणून एका वादाला तोंड फोडले आहे.

Amey Vs Sumeet Raghwan

अमेयच्या पहिल्या फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यानं जंगलात राघू Sumeet Raghvan खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो... याची कृपया नोंद घ्यावी. असं म्हटलं आहे. त्याची ही सुचक पोस्ट चाहत्यांना भावली आहे. काही वेळेपूर्वी त्यानं केलेल्या या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यावरुन त्याला काही नेटकऱ्यांनी प्रश्नही विचारले आहेत. जसे की फास्टर फेणेच्या वेळचा हा वाद आहे का, असं काय झालं की अमेय हा सुमित राघवन यांच्यावर चिडला आहे, अमेय हा एकटाच वाघ आहे.... अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट त्या पोस्टवर आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gokul Politics: 968 संस्था बाहेर, 'SIR पॅटर्न'ची चर्चा? गोकुळमध्ये काय सुरू आहे?

"तू नक्की २०० धावा करशील, फक्त..." आयपीएलचा बादशहा बनलेल्या वैभव सूर्यवंशीला ललित मोदींचा सल्ला, तू मोठा सेलिब्रिटी..

Latest Marathi News Live Update : साक्री तालुक्यात कपाशी लागवडीला वेग; शेतशिवारात लगबग वाढली

Graduate Youth News : D.Ed झालं, MPSC दिली, पण...; कायमस्वरूपी नोकरी आणि लग्न न ठरल्याने 38 वर्षीय पदवीधर युवकानं उचललं टोकाचं पाऊल

Video : कमळी पडणार हृषि सरांच्या प्रेमात ! प्रोमो पाहून प्रेक्षक खुश "आमची अखेर प्रतीक्षा संपली.."

SCROLL FOR NEXT