amisha.jpg 
मनोरंजन

'या' हाॅट अभिनेत्रीला होऊ शकते कधीही अटक, वाचा काय आहे प्रकरण

वृत्तसंस्था

मुंबई : कहो ना प्यार है या एका चित्रपटाने बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना केली गेलेली अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल होय. हीच अभिनेत्री सध्या अडचणीत सापडली आहे. ती एका वेगऴ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

अमिषा पटेल मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर आहे. रांची कोर्टानं अमिषा पटेलच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. अमिषावर प्रोड्युसर अजय कुमारनं अडीच कोटींचा चेक बाउंस केल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर आता अमिषा पटेलच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

दरम्यान, प्रोड्युसर अजय कुमार यांनी 2018 मध्ये अमिषाला 'देसी मॅजिक' हा सिनेमा तयार करण्यासाठी 3 कोटी रुपये उधार दिले होते. त्यानंतर जेव्हा त्यांनी अमिषाकडे पैसे मागितले. त्यावेळी ती टाळाटाळ करू लागली. नंतर हा सिनेमा सुद्धा बंद झाला. त्यामुळे अजय यांनी पुन्हा एकदा त्यांचे पैसे परत मागितले. त्यावर अमिषानं त्यांना अडीच कोटींचा चेक दिला मात्र तो बाउंस झाला.

या प्रकरणी प्रोड्युसर अजय यांनी अमिषाच्या विरोधात रांची कोर्टात फसवणूकीची केस दाखल केली. अजय यांनी सांगितलं, केस दाखल केल्यानंतरही त्यांनी अमिषाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र अमिषा त्यांचा फोनही उचलला नाही आणि त्यांना भेटली सुद्धा नाही. यानंतर कोर्टानं अमिषाला समन्स पाठवले आणि या पैशांबाबतची कारवाई चालूच राहिली. अमिषावर असे आरोप आहेत की, जेव्हा अजय त्यांच्याकडे पैसे मागायला गेले त्यावेळी काही प्रसिद्ध व्यक्तींसोबतचे फोटो दाखवून अमिषानं अजय यांना धमकावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, अशा प्रकारचा आरोप असण्याची अमिषाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिच्यावर फसवणूकीचा आरोप झाला आहे. आमिषा पटेलवर या अगोदरही फसवणूकीचे आरोप लावण्यात आले आहेत. अमिषावर एका इव्हेंट ऑर्गनायजरकडून 11 लाख रुपयांच्या फसवणूकीचा आरोप आहे. एका वेडिंग इव्हेंटमध्ये डान्स करण्यासाठी 11 लाख रुपये घेऊन अमिषानं या इव्हेंटला हजेरी लावलीच नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy : रोहित शर्माच्या १५५ धावा... १८ चौकार अन् ९ षटकार; मुंबईचा दणदणीत विजय

Swiggy Instamart Report : 'या' पठ्ठ्याने वर्षात कंडोमवर खर्च केलेत चक्क १ लाख रुपये! महिन्याला १९ ऑर्डर्स; व्हॅलेंटाईन डेला तर...

Latest Marathi News Live Update : माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे 88 व्या वर्षी निधन

Nashik Election : मतदारांपेक्षा ग्रह-ताऱ्यांवरच अधिक भर! नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुहूर्तांची 'लगीनघाई'

iPhone 16 फक्त 40 हजारात; 'या' ट्रिकने मिळेल 29 हजारचा डिस्काउंट, ऑफर कुठे सुरुय पाहा

SCROLL FOR NEXT