Ameesha Patel  Esakal
मनोरंजन

Amisha Patel: वयाची पन्नाशी गाठणाऱ्या अमिषाला करायचयं टॉम क्रूझशी लग्न! म्हणते,..

Vaishali Patil

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयापेक्षा बाकीच्या कारणांमुळेच जास्त चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या काही काळात अमिषा पटेल चित्रपट सृष्टीपासून जरा दूरच होती.

एखाद्या चित्रपटात छोट्या भूमिकेत ती दिसत होती . मात्र, आता ती लवकरच गदर या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे.

अमिषा पटेल एक अप्रतिम अभिनेत्री आहे. आजही ती अनेकदा तिच्या सौंदर्य आणि बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अलीकडेच तिचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. अमिषाचे देशभरात खूप चाहते आहेत. पण अमिषा कुणाची फॅन आहे माहित याबद्ल जेव्हा तिला विचारण्यात आलं तेव्हा तिने झटकन हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ याची ती खूप मोठी फॅन असल्याचं सांगतिलं.

त्याच झालं असं की अमिषानं नुकतिच 68 व्या ह्युंदाई फिल्मफेअर अवॉर्ड्स हजेरी लावली. यावेळी जेव्हा अमीषा रेड कार्पेटवर, अमीषाला विचारण्यात आलं की तिला जर कुण्या अशा अभिनेत्रीची जागा घ्यायची असेल तर ती कोणत्या अभिनेत्रीसोबत तिची जागा बदलेल . यावर अमिषाने उत्तर दिले की, 'टॉम क्रूझसोबत चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळालेल्या कोणत्याही अभिनेत्रीसोबत तिला तिची जागा बदलायला आवडेल.'

ती अभिनेत्याची खूप मोठी फॅन आहे. याशिवाय अमिषा म्हणाली, 'जर तिला शक्य असते तर तिनेही त्याच्याशी लग्न केले असते'. यासोबतच तिने खुलासा केला की मोठी होत असताना तिच्या खोलीत हॉलिवूड स्टार्सचे पोस्टर्स होते. आता अमिषाचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

अमिषाचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून सकीना फेम अमिषा पटेल चर्चेत आली आहे. यापूर्वी तिच्या कहो ना प्यार है या चित्रपटानंतर तिच्या लोकप्रियतेत खुपच वाढ झाली होती.

2000 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'कहो ना प्यार है' मधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अमिषा पटेलने 18 वर्षांच्या करिअरमध्ये 40 हून अधिक चित्रपट केले आहेत. करिअरच्या सुरुवातीला अमिषा पटेलचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्टसोबत अफेअर होते. विक्रम भट्टनंतर तिने लंडनमधील बिझनेसमन कनव पुरीसोबतही तिचे नाव जोडले गेले. त्यानंतर बिझनेसमन नेस वाडियासोबतही यांच्यासोबत अमिषाच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच रंगल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT