Amitabh Bachchan 80th birthday celebration,surprise fans at midnight Google
मनोरंजन

Viral Video: आपल्या 80 व्या वाढदिवसानिमित्त अर्ध्या रात्री अमिताभचं चाहत्यांना सरप्राइज...

11ऑक्टोबर,2022 रोजी अमिताभनी आपला 80 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.

प्रणाली मोरे

Happy Birthday Amitabh bachchan: 11 ऑक्टोबर २०२२ रोजी अमिताभ बच्चन यांनी आपला ८० वा वाढदिवस साजरा केला. बिग बी यांच्या चाहत्यांसाठी हा दिवस एखाद्या सणासारखाच असतो. अमिताभनी आपल्यावरील चाहत्यांचे हे प्रेम लक्षात घेऊनच त्यांना सरप्राइज दिलं. बिग बी यांनी अर्ध्या रात्री आपल्या जलसा बंगल्याच्या बाहेर आपल्या चाहत्यांची भेट घेतली,त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला आणि आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा चाहत्यांनी दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.(Amitabh Bachchan 80th birthday celebration,surprise fans at midnight)

११ ऑक्टोबरची पहाट म्हणूया की मध्यरात्रीची वेळ म्हणूया... अमिताभच्या जलसा बंगल्याबाहेरचं वातावरण मात्र आनंदात न्हाऊन निघालं होतं. अर्थात महानायकाला त्याच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला त्याचे चाहते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अमिताभ यांच्या चाहत्यांपैकी कुणी केक आणला होता,कुणाच्या हातात वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बोर्ड होता. लोक अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग जोरजारात बोलत होते. तर कुणी त्यांच्या गाण्यांवर ठेका धरला होता.पण हे सगळं चाहते त्यांच्या आनंदासाठी करत होते मग भले शहंशाह त्यांना दर्शन देवो की न देवो. पण कालची रात्र चाहत्यांसाठी पर्वणी ठरली जेव्हा मध्यरात्र उलटून गेली असतानाही ८० वर्ष पार केलेले अमिताभ आपल्या चाहत्यांसाठी बंगल्याच्या बाहेर केवळ चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारायला आले. अमिताभ बाहेर येऊन चाहत्यांना भेटले,त्यांनी केकही कापला. मोठ्या आनंदात त्यांनी आपल्या चाहत्यांच्या शुभेच्छांचा मान राखत त्या स्विकारल्या. बातमीत सेलिब्रेशनचा व्हिडीओ जोडलेला आहे.

अमिताभ यांच्या जलसा बंगल्या बाहेरचा तो सेलिब्रेशन व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांची मुलगी श्वेता बच्चनही दिसत आहे. आपल्या वडीलांसाठी चाहत्यांचे हे प्रेम पाहून श्वेताच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत होता. अमिताभ बच्चन यांना अचानक पाहून चाहत्यांना आनंदाचा मोठा धक्का बसला होता. कोणी आपल्या कॅमेऱ्यात बिग बींना कैद करत होतं तर कुणी आपल्या नजरेत त्यांना सामावून घेत होतं. सोशल मीडियावर ११ ऑक्टोबरला अमिताभ बच्चन जोरदार ट्रेंडिंगला होते. सर्वसामान्य चाहत्यांपासून मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सारेच अमिताभना शुभेच्छा देत होते..

अमिताभ यांच्या चाहत्यांनी तर त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं सेलिब्रेशनची हद्दच पार केलेली दिसून आली. सत्यवान गीते या रिक्षा चालकानं अमिताभ यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपल्या रिक्षाला फुलांनी सजवलं आहे. रिक्षाच्या चारही बाजूंना अमिताभचे फोटो लावले आहेत. आणि त्यावर त्यांच्यासाठी शुभेच्छा संदेश लिहिला आहे. सत्यवानच्या म्हणण्यानुसार ३ वर्ष आधी अमिताभ यांनी त्यांच्या रिक्षामधून प्रवासही केला आहे. सत्यवान दरवर्षी अमिताभ यांच्या वाढदिवशी हे असं सेलिब्रेशन करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT