amitabh bachchan Team esakal
मनोरंजन

बिग बी यांना एवढा राग का आलायं?

बिग बी यांनी नुकतचं नवीन घर खरेदी केले आहे. त्याची किंमत ही 31 कोटी एवढी आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) हे सोशल (social media) मीडियावर अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टीही त्या ते चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसून आले आहेत. त्यासाठी ते नियमितपणे ब्लॉगचे लेखनही करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहणे बिग बी यांना आवडते. आता त्यांना एका गोष्टीचा प्रचंड राग आला आहे. त्याबद्दल त्यांनी सांगितले आहे. बिग बी यांनी नुकतचं नवीन घर खरेदी केले आहे. त्याची किंमत ही 31 कोटी एवढी आहे. (amitabh bachchan angry he could not find manuscripts of his late father harivansh rai bachchan )

अमिताभ हे आपले वडिल कवी हरिवंश राय बच्चन (harivansh rai bachchan) यांच्या अनेक आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. चाहतेही त्याला प्रतिसाद देतात. बिग बी जेव्हा आपल्या वडिलांच्या कविता पोस्ट करतात तेव्हा अमिताभ त्या कवितांच्या अनुषंगानं आपल्या बॉलीवूड (bollywood journey) प्रवासातील आठवणीही चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसून आले आहेत. आता त्यांना आपल्या वडिलांनी लिहिलेली एक कविता सापडत नाही. त्यामुळे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.

बिग बी यांना या गोष्टीनं कमालीचा राग आला आहे. सध्या त्यांच्या घराचे रिनोव्हेशनचे काम सुरु आहे. त्यावेळी त्यांना ती कविता सापडत नसल्यानं त्यांचा रागाचा पारा वाढला आहे. यावरुन त्यांनी ब्लॉग लिहायला घेतला आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

अमिताभ यांनी हरिवंश राय बच्चन यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात त्यांची कविताही आहे. त्या ब्लॉगमध्ये अमिताभ लिहितात, माझ्या वडिलांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या कवितांचे संदर्भ आहेत. मात्र जेव्हा मी त्या कवितांचा शोध घेतो तेव्हा त्या कविता मला सापडत नाही. तेव्हा माझी चिडचिड होते. काही दिवसांपूर्वी घरातलं सगळं काम झालं. त्यामुळे वडिलांची कविता कुठे गेली असा प्रश्न मला सारखा सतावत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डिश बसवताना डोक्यावर पडली वीट

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT