gulabo sitabo 
मनोरंजन

अमिताभ-आयुष्मान स्टारर 'गुलाबो सिताबो'चा मजेशीर टीझर रिलीज

सकाळवृत्तसेवा

मुंबई- लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे अनेक सिनेमे आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय अनेक निर्माते घेत आहेत. बिग बी अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा 'गुलाबो सिताबो' सिनेमाही डिजीटलवर रिलीज करणार असल्याची काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती. १२ जुनला ऍमेझॉन प्राईमवर रिलीज होणा-या या सिनेमाचा टिझर नुकताच समोर आला आहे. यात 'गुलाबो सिताबो' सिनेमाचा ट्रेलर लवकरंच भेटीला येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. व्यापारतज्ज्ञ आणि सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मिडीयावर 'गुलाबो सिताबो'चा टिझर रिलीज केला आहे. 

अमिताभ आणि आयुष्मान खुराना स्टारर 'गुलाबो सिताबो' हा सिनेमा १७ एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार होता मात्र लॉकडाऊनमुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकला नाही. आता हा सिनेमा १२ जूनला रिलीज होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर लवकरंच समोर येणार असल्याची माहीती सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी दिली आहे.

अमिताभ यांच्या या सिनेमाचा पहिला लूक समोर आला आहे ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातंच पहिल्यांदा अमिताभ आणि आयुष्मान ही जोडी एकत्र आली असून त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दिग्दर्शक शुजीत सरकारने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. शुजीत यांनी याआधी अनेक सिनेमांमध्ये बिग बींसोबत काम केलं आहे. एकानंतर एक लहान सहान सिनेमे लॉकडाऊनमुळे डिजीटलवर रिलीज होत असताना आता 'घुमकेतू', 'गुलाबो सिताबो' आणि 'शकुंतला देवी' या सिनेमांनंतर कोणता बडा सिनेमा डिजीटल होणार हेच पाहायचंय.     

amitabh bachchan ayushmann khurrana gulabo sitabo teaser released  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin September Installment : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा; 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार

Satara Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू; वनधिकाऱ्यांना निलंबित करेपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नाही, नागरिकांचा आक्रमक पवित्रा

16 तास उपवास, रोज 6 KM चालणं; 61 व्या वर्षी निवेदिता 'असा' आहे सराफ फिटनेस मंत्रा? म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : उद्धव-राज ठाकरे मोर्चास्थळाकडे रवाना

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT