Amitabh Bachchan begins shooting for Kaun Banega Crorepati 15 Esakal
मनोरंजन

Kaun Banega Crorepati 15: करोडपती व्हायचंय मग व्हा तयार! 'कौन बनेगा करोडपती 15'च्या शुटिंगला सुरुवात..

Vaishali Patil

Kaun Banega Crorepati 15: टिव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपती हा प्रेक्षकांचा आवडीचा शो आहे. गेल्या 23 वर्षांपासून हा शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. हा शो जेव्हाही छोट्या पडद्यावर येतो तेव्हा तो प्रेक्षकांचा या शोला चांगला प्रतिसाद मिळत असतो. या शोमधुन प्रेक्षकांचे मनोरंजनच नव्हे तर त्यांच्या ज्ञानातही भर पडते.

यंदा या शोचा 15 वा सिझन प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या शोची प्रतिक्षा करत होते.

बॉलिवूडचे बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन हा शो होस्ट करतात. त्यांच्या विनोदी आणि तितिक्याच गंभीर शैलीमुळे ते प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

आता या कौन बनेगा करोडपतीचा 15 वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता त्यातच बिग बींनी चाहत्यांना या शो बद्दल अपडेट दिली आहे. त्यांनी शोच्या सेटवरचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर केला आहे.

(Amitabh Bachchan begins shooting for Kaun Banega Crorepati 15)

बिग बी केबीसीच्या सेटवर उभे असल्याचा अंदाज फोटो पाहिल्यानंतर येतो. त्यामुळे या फोटोवरुन कळतं की आता या शो साठीप्रेक्षकांना जास्त प्रतिक्षा करावी लागणार नाही.

यानंतर त्यांनी आणखी एक फोटो शेयर केला आहे, ज्यात ते काळा कोट-पँट घालून पोज देत आहे. त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'केबीसीसाठी पुन्हा पुन्हा रिहर्सल सुरु आहे.' याचा अर्थ असाच कि केबीसी आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या महिन्यात कौन बनेगा करोडपती 15 च्या निर्मात्यांनी या शोचा नवीन प्रोमो रिलीज केला होता. या प्रोमोद्वारे अमिताभ बच्चन यांनी यावेळी शोचे स्वरुप बदणार असल्याचं सांगितलं. आता ते बदल काय असतील, हे शो पाहिल्यानंतरच कळेल.

कौन बनेगा करोडपतीची सुरुवात 2000 साली झाली. या शोचा 15वा सीझन सोनी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. शोसाठी नोंदणी सुरु झाली आहे. मात्र हा शो कधी सुरू होणार, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते केबीसी व्यतिरिक्त आगामी चित्रपट प्रोजेक्ट के तयारी करत आहेत. ज्यात त्याच्यासोबत प्रभास आणि दीपिका असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT