Amitabh Bachchan Big B Bollywood Bike Ride esakal
मनोरंजन

Amitabh Bachchan Video : 'सेटवर पोहचायला उशीर झालाय, सोडतो का?' 'बिग बीं' नी मागितली रस्त्यावरच्या व्यक्तीकडं लिफ्ट

कित्येक दिग्गज सेलिब्रेटींनी अमिताभ यांच्या सेटवर वेळेत येण्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Amitabh Bachchan Big B Bollywood Bike Ride : बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन हे त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईलसाठी ओळखले जातात. वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यानंतरही अमिताभ यांचा उत्साह हा नवोदित कलाकारांना लाजवणारा आहे. बिग बी हे सोशल मीडियावर देखील व्हायरल होत असतात. आता त्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ हा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत ते त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल ओळखले जातात. अमिताभ बच्चन हे देखील त्यापैकी एक आहे. यापूर्वीच्या अनेक मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयी सांगितले आहे. कित्येक दिग्गज सेलिब्रेटींनी अमिताभ यांच्या सेटवर वेळेत येण्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. आता जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये बिग बी यांना सेटवर पोहचायला उशीर झाला असे सांगत जे केलं त्याची चर्चा होताना दिसते आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बिग बी यांना सेटवर पोहचण्यास उशीर झाल्यानंतर त्यांनी रस्त्यावरील एकाकडे लिफ्ट मागत त्या सेटवर सोडण्याची विनंती केली. त्या व्यक्तीसोबत बिग बी यांनी बाईक राईड तर केलीच याशिवाय सेटवर वेळेतही पोहचले. बिग बी यांच्या नातीनं नव्या नवेलीनं देखील आजोबांचे कौतूक केले आहे. तिला तर तो व्हिडिओ पाहताना हसू आवरलेलं नाही. त्या व्यक्तीमुळे अमिताभ हे सेटवर लवकर पोहचले. बिग बी यांनी त्यांच्या इंस्टा अकाउंटवरुन तो खास व्हिडिओ शेयर केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. बिग बींचे नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे. त्या पोस्टवर आलेल्या कमेंट्स देखील भन्नाट आहे. तुम्ही ग्रेटच आहात सर, तुमचा वक्तशीरपणा आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अशा शब्दांत चाहत्यांनी अमिताभ यांचे कौतूक केले आहे.

अमिताभ यांनी त्या बाईक रायडरचे देखील आभार मानले आहे. मित्रा खूप खूप धन्यवाद, तुझ्यामुळे मला माझ्या सेटवर वेळेत पोहचण्यास मदत झाली. वाहतूक कोंडीमध्ये प्रवास करणे अवघड झाले आहे. अशात तू केलेली मदत खूपच मोलाची आहे. अशा शब्दांत अमिताभ यांनी त्या व्यक्तीचे आभार मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT