amitabh bachchan birthday celebration at KBC 15 set emotional video viral  SAKAL
मनोरंजन

KBC 15: "आणि महानायकाला रडू कोसळलं", कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा भावूक व्हिडीओ

KBC 15 च्या मंचावर अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी बिग बींना रडू कोसळलं

Devendra Jadhav

Amitabh Bachchan Emotional at KBC 15: अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेसृष्टीतले महानायक म्हणून ओळखले जातात. अमिताभ यांनी गेली वर्ष भारतीय सिनेसृष्टीवर राज्य केलं. वयाची ऐंशी ओलांडली तरी अजुनही अमिताभ बच्चन भारतीय मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत.

अमिताभ सध्या KBC 15 चं सूत्रसंचालन करत आहेत. उद्या ११ ऑक्टोबरला अमिताभ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने KBC 15 च्या मंचावर अनोखं सेलिब्रेशन करण्यात आलं. हे पाहून अमिताभ यांचे डोळे भरून आले.

(amitabh bachchan birthday celebration at KBC 15)

आणि अमिताभ बच्चन यांना रडू कोसळलं

एरवी KBC 15 पाहताना अमिताभ बच्चन स्पर्धकांना धीर देत असतात. कोणी जर इमोशनल झालं तर बच्चन साहेब त्यांना आधार देताना असतात. पण KBC 15 च्या मंचावर पहिल्यांदाच अमिताभ बच्चन प्रचंड भावूक झालेले दिसले.

KBC च्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस सर्वात खास पद्धतीने साजरा केला जातो. सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन आपल्या सीटवरून उठतात, स्वतःसाठी टिश्यू घेतात आणि भरलेल्या डोळ्यातील अश्रू पुसतात.

या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, 'तुम्ही मला अजून किती रडवणार?. मी आजवर लोकांना टिश्यू देतो आणि आज मला टिश्यू घेण्याची वेळ आली आहे."

अमिताभ बच्चन यांचा ८१ वा वाढदिवस

उद्या बुधवारी अमिताभ बच्चन त्यांचा ८१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी वयाची ८० वर्ष ओलांडली. आजही ते सळसळत्या उर्जेने काम करत आहेत.

एकीकडे KBC 15 चं सूत्रसंचालन, दुसरीकडे जाहीराती, सिनेमातं शूटींग अशा अनेक गोष्टी अमिताभ व्यवस्थित मॅनेज करताना दिसतात. बच्चन साहेबांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी आतापासूनच सुरु झालेली दिसतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT