amitabh bachchan birthday celebration outside jalsa with fans at midnight SAKAL
मनोरंजन

Amitabh Bachchan Birthday: रात्री जलसाच्या बाहेर फॅन्ससोबत बिग बींनी केलं वाढदिवसाचं सेलिब्रेशन

अमिताभ बच्चन आज त्यांचा ८१ वा वाढदिवस साजरा करत आहेत

Devendra Jadhav

Amitabh Bachchan Birthday Celebration News: आज भारतीय मनोरंजन विश्वातला महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. अमिताभ आज त्यांचा ८१ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे फॅन्स कायम उत्सुक असतात. यंदाही फॅन्स बिग बींच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी त्यांच्या घराबाहेर थांबले होते. मग पुढे काय झालं बघूया.

(amitabh bachchan birthday celebration outside jalsa with fans at midnight)

अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर अनोखं बर्थडे सेलिब्रेशन

रात्रीचे १२ वाजून गेले होते. बिग बींचं घर जलसाच्या घराबाहेर फॅन्सची प्रचंड गर्दी होती. सगळे जण लाडक्या महानायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला एकत्र आले होते.

अशातच चाहूल लागली आणि अमिताभ बच्चन त्यांच्या घराबाहेर आले. रात्री अमिताभ यांनी सर्व फॅन्सची भेट घेऊन सर्वांसोबत अनोखं बर्थडे सेलिब्रेशन केलं. काळ्या रंगाची ट्रॅक पँट, गुलाबी हुडी आणि डोक्यावर टोपी अशा स्टायलिश लूकमध्ये अमिताभ यांनी सर्व फॅन्सच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना रडू कोसळलं

एरवी KBC 15 पाहताना अमिताभ बच्चन स्पर्धकांना धीर देत असतात. कोणी जर इमोशनल झालं तर बच्चन साहेब त्यांना आधार देताना असतात. पण KBC 15 च्या मंचावर पहिल्यांदाच अमिताभ बच्चन प्रचंड भावूक झालेले दिसले.

KBC च्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस सर्वात खास पद्धतीने साजरा केला जातो. सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन आपल्या सीटवरून उठतात, स्वतःसाठी टिश्यू घेतात आणि भरलेल्या डोळ्यातील अश्रू पुसतात.

या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, 'तुम्ही मला अजून किती रडवणार?. मी आजवर लोकांना टिश्यू देतो आणि आज मला टिश्यू घेण्याची वेळ आली आहे."

अमिताभ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या खास वस्तूंचा लीलाव

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील खास वस्तूंचा लीलाव आयोजित करण्यात आला होता. बच्चन साहेबांच्या फॅन्सनी इतका उदंड प्रतिसाद दिला वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला एक जागतिक विक्रम तयार झालाय. निवडणूक प्रचाराचे कार्ड, शोले टॉक-बॉक्स आणि दीवार या एकाच ऑफसेट शोकार्डने लीलावामध्ये विक्रम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

Pune Land Scam : निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण!

SCROLL FOR NEXT