Amitabh Bachchan Birthday special auction, Sholay Zanjeer deewar records fetch record bids  SAKAL
मनोरंजन

Amitabh Bachchan Birthday: अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त लीलाव, शोले - जंजीरच्या रेकॉर्डना विक्रमी बोली

अमिताभ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही खास वस्तूंचा लीलाव करण्यात आला

Devendra Jadhav

अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेसृष्टीचे महानायक म्हणून ओळखले जातात. अमिताभ यांचा उद्या ११ ऑक्टोबरला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अमिताभ यांच्या आयुष्यातील खास गोष्टींचा लीलाव करण्यात आला.

अमिताभ बच्चन यांच्या फॅन्सनी या लीलावाला उदंड प्रतिसाद दिला. आणि लाखोंची बोली लावली. बघा या बोलीमध्ये कोणत्या वस्तू किती रुपयांना विकल्या गेल्या.

(Amitabh Bachchan Birthday special auction)

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त हा खास लीलाव आयोजित करण्यात आला होता. बच्चन साहेबांच्या फॅन्सनी इतका उदंड प्रतिसाद दिला वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला एक जागतिक विक्रम तयार झालाय. निवडणूक प्रचाराचे कार्ड, शोले टॉक-बॉक्स आणि दीवार या एकाच ऑफसेट शोकार्डने लीलावामध्ये विक्रम केले.

डिसेंबर 1984 मध्ये दिग्गज राजकारणी हेमवती नंदन बहुगुणा यांच्या विरोधात अलाहाबाद मतदारसंघातून लोकसभेच्या राजकीय प्रचारात वापरल्या गेलेल्या अमिताभ बच्चन यांच्या प्रमोशनल कार्डसाठी सर्वाधिक बोली प्राप्त झाली. हे कार्ड ६७,२०० रुपयांना विकलं गेलं.

जंजीर, जमीर, दीवार, राम बलराम अशा चित्रपटांच्या शोकार्ड्स, दोन्ही हाताने कोलाज केलेले आणि ऑफसेट अशा सर्व वस्तूंना 50,000 रुपयांपची बोली लावण्यात आली.

याशिवाय अपेक्षेप्रमाणे शोले सिनेमाविषयी सर्व वस्तू चांगल्या किमतीत विकल्या गेल्या. याशिवाय 15 फोटोग्राफिक स्टिल्स संचापासून ते अनोखे टिन बॉक्स आणि व्हिंटेज माल, बॉक्सवर मोटारसायकल-साइडकारसह शोलेमधील 'मैत्री' दृश्याचे चित्रण करणार्‍या मूळ टॅल्क-बॉक्स अशा अनेक गोष्टी विकत घ्यायला लोकं उत्सुक होते.

याशिवाय अमिताभ बच्चन यांच्यासंबंधी ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफला सुद्धा प्रेक्षकांची चांगली पसंची मिळाली.

काही फोटोग्राफ, जसे की मुहम्मद अली यांच्या बेव्हरली हिल्स येथील निवासस्थानी काढलेला फोटो, याशिवाय अमिताभ यांचा भाऊ अजिताभ आणि वडील हरिवंशराय बच्चन यांच्यासोबतचा एक अनमोल फोटो. अशा अनेक फोटो अंदाजापेक्षा जास्त किमतीन विकले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी

SCROLL FOR NEXT