amitabh and sunny leone
amitabh and sunny leone Team esakal
मनोरंजन

अमिताभ झाले सनी लिओनीचे शेजारी, फ्लॅटची किंमत माहितीये?

युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींची कोटींची खरेदी ही नेहमीच सुरु असते. त्याची चर्चाही सोशल मीडियावर व्हायरल होत असते. गेल्या काही महिन्यांपूर्वी बॉलीवूडची प्रसिध्द जोडी रिचा चढ्ढा (richa chadha) आणि अली फैजल (ali faizal) यांनीही मुंबईमध्ये घर घेतले होते. त्यानंतर विराट कोहली (virat kohli) आणि अनुष्कानंही (anushka sharma) नवे घर घेऊन त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. आता त्यानंतर बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ (amitabh bachchan) यांनी नवा फ्लॅट खरेदी केला आहे. त्याची किंमत ऐकल्यास तुम्हाला भोवळ आल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अमिताभ हे प्रसिध्द अभिनेत्री सनी लिओनीचे शेजारी झाले आहेत. (amitabh bachchan buys duplex in mumbai became sunny leone neighbour)

काही दिवसांपूर्वी सनी लिओनीनं (sunny leone ) घर खरेदी करणार असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. आता अमिताभ (amitabh bachchan) तिचे शेजारी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अमिताभ यांनी मुंबईमध्ये तब्बल 31 कोटींचा फ्लॅट खरेदी केला आहे. तो ड्युप्लेक्स आहे. एका संकेतस्थळानं दिलेल्या माहितीनुसार अमिताभ यांनी पाच हजार स्क्वेअर फूटचा फ्लॅट खरेदी केला आहे. त्यांनी हा ड्युप्लेक्स अटलांटिस प्रोजेक्टमध्ये खरेदी केला आहे.

बिग बी यांनी डिसेंबर 2020 मध्ये ही प्रॉपर्टी खरेदी केली होती. त्याचे रजिस्ट्रेशन एप्रिल 2021 मध्ये केले. त्यांनी महाराष्ट्र सरकारला 62 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्कही दिले आहे. राज्य सरकारनं कोरोना संक्रमणाच्या काळात मुद्रांक शुल्कमध्ये काही सुट दिली होती. त्याचा फायदा अमिताभ यांना झाला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये राज्यसरकारनं मुद्रांक शुल्कमध्ये पाच टक्क्यांच्या ऐवजी दोन टक्के मुद्रांक शुल्क कर आकारण्यात येणार असल्याचे सांगितले. जेणेकरुन रियल एस्टेटला सपोर्ट मिळेल अशी भूमिका त्यामागे होती.

अमिताभ यांच्या नव्या घराविषयी सांगायचे झाल्यास त्यांना एक नव्हे तर सहा गाड्या पार्क करण्यासाठी जागा मिळाली आहे. 28 मजली या इमारतीमध्ये बिग बी यांचा फ्लॅट 27 व्या मजल्यावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT