Amitabh Bachchan epic replay to Abhishek Bachchan Ghoomar esakal
मनोरंजन

Amitabh Bachchan Reaction: 'माझ्या मुलाची चिंता करु नका, तो तर...!' अभिषेकवर टीका करणाऱ्यांना अमिताभ यांचे जशास तसे उत्तर

अभिषेकच्या अभिनयानं प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट हिट ठरताना दिसतो आहे.

युगंधर ताजणे

Amitabh Bachchan epic replay to Abhishek Bachchan Ghoomar : बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतात. गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी छाप उमटविणाऱ्या अमिताभ यांचा चाहतावर्ग हा जगभर पसरला आहे.

अमिताभ सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. त्यांच्या लाडक्या लेकाचा अभिषेक बच्चनचा घूमर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आर बाल्की यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटानं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. त्यात सैय्यामी ही प्रमुख अभिनेत्री असून अभिषेकच्या अभिनयानं प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट हिट ठरताना दिसतो आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

आता काही नेटकऱ्यांनी अभिषेक बच्चनच्या त्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिषेकची तुलना केली आहे. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. अशातच बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील त्या नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेवर जशास तसे उत्तरही दिले आहे. त्या नेटकऱ्यानं अभिषेकच्या अभिनयावरुन कमेंट केली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

त्यावर बिग बी यांची प्रतिक्रियाही चाहत्यांचे लभ वेधून घेताना दिसत आहे. स्पोर्टस ड्रामा प्रकारातील घूमर या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. त्यानं काही प्रमाणात प्रेक्षकांची पसंतीही मिळवली होती. क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी घूमरचे कौतुक केले होते. त्यात विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर यांच्या प्रतिक्रियाही व्हायरल झाल्या होत्या.

अमिताभ यांनी जेव्हा अभिषेकचा हा चित्रपट पाहिला तेव्हा ते खूप आनंदित झाले. त्यांनी अभिषेकचे कौतुकही केले. त्यांनी हा चित्रपट दोनवेळा पाहिला. एका युझर्सनं अभिषेकच्या अभिनयावरुन केलेली ती कमेंट चर्चेत आली आहे. त्यात त्यानं म्हटलं आहे की, मी जेव्हा अभिषेककडे पाहतो तेव्हा त्याचे मला खूपच वाईट वाटते. त्याला नेहमीच कमी लेखले गेले आहे.

अभिषेकनं यापूर्वी युवा, गुरु,धूम, कभी अलविदा ना कहना, दोस्ताना, सरकार सारख्या चित्रपटातून स्वताला सिद्ध केले आहे. तरीही त्याच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारे बोलले जाते. बिग बी यांनी त्या युझर्सला लिहिलं आहे की, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आनंदी राहा. त्याच्या विषयी चिंता नको. तो आणखी चांगल्या प्रकारे प्रयत्न करतो आहे. अशा शब्दांत बिग बी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT