Amitabh Bachchan, Jaya Bachchan, Abhishek,Aishwarya & Aaradhya Bachchan Google
मनोरंजन

बच्चन कुटुंबावर पुन्हा कोरोना संकट; 'या' सदस्याला शूटिंग पडलं महागात

गेल्या वर्षी दुसऱ्या लाटेदरम्यानअमिताभ,अभिषेक,ऐश्वर्या,आराध्या यांना कोरोनाची लागण झाली होती.

प्रणाली मोरे

करण जोहरला (Karan Johar) आपल्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचं शुटिंग लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे. पण तसं होताना दिसत नाही आहे,काही ना काही अडचणी त्याच्या मार्गात उभ्या राहत आहेत. कोणती ना कोणती अडचण येत आहे आणि त्याच्या सिनेमाचं शूटिंग मध्येच थांबवलं जात आहे. याआधी कोरोनाचे निर्बंध पुन्हा कडक केले त्या कारणानं त्यानं आपलं मुंबई-दिल्लीतलं शुटिंग अनुक्रमे थांबवलं होतं. पण आता नियम थोडे शिथिल केल्यानंतर शूटिंगच्या तारखा त्यानं पुन्हा लावल्या. पण तिथेही कोरोनानं आडकाठी आणलीच. सुरुवातीला सिनेमात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर सिनेमाचं शूटिंग त्वरित थांबवण्यात आलं. पण आता बातमी येत आहे की शबाना आझमी यांच्या संपर्कातील सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता जया बच्चन यांचे कोरोना रीपोर्ट्सही पॉझिटिव्ह आल्याचं समजतंय. त्यामुळे आता पुन्हा सिनेमाचं शूटिंग थांबवलं गेल्याचं बोललं जात आहे.

सूत्रांनुसार,करण जोहरने शबाना आझामी आणि आता जया बच्चन(Jaya Bachchan) यांचे कोरोना रीपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर शूटिंग थांबवलं आहे. शबाना आझमी यांच्यानंतर काहीच दिवसांत आता जया बच्चन यांनाही कोरोना झाल्याचं कळत आहे. त्यामुळेच करणने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाचं शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सेटवरील इतर कुणाला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून करणने त्वरितहा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. सांगितलं जात आहे की, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचं शूटिंग २ फेब्रुवारीला सुरू करून १४ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याचा विचार करणचा होता.

खरंतर गेल्यावर्षी कोरोनाच्या दूसऱ्या लाटेत अमिताभ यांच्या घरी सगळ्यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यातनं सगळे व्यवस्थित बरेही झाले. पण आता पुन्हा जया बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बच्चन कुटुंबियांवर कोरोनाचं संकट ओढवलं आहे. तर दुसरीकडे शबाना आझमी यांच्या घरी लवकरच जावेद अख्तर यांचा चिरंजिव फरहान अख्तर दुसऱ्यांदा लग्नबेडीत अडकणार आहे. तो आपली गर्लफ्रेंड शिंबानी दांडेकर हिच्याशी लग्न करणार आहे. या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक मंडळी आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha: समृद्धीवर ट्रॅव्हल्स ट्रकवर मागून धडकली; मेहकरजवळील घटना; १५ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी

Karad Highway: कऱ्हाडमध्ये पहिल्याच पावसात महामार्गाची पोलखोल; गटार तुंबले, पाणी-चिखल रस्त्यावर, गटारावरील तुटलेली झाकणेही जीवघेणी

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना धक्का! सलग 10 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ; 10 ग्रॅमचा नवा दर किती?

Pune News: महसूल विभागालाच चकवा! बनावट शासकीय आदेशांचे रॅकेट उघड; भूमाफियांमध्ये खळबळ, महसूल अभिलेखांत फेरफार

Latest Marathi News Update : रमेश केरे पाटील यांचे विखे पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT