Amitabh Bachchan  Esakal
मनोरंजन

Amitabh Bachchan: क्या बात! बिग बी कामावर परतले म्हणाले,'कामापेक्षा चांगला'

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या अपघातामुळे चर्चेत आहेत. हैदराबादमध्ये 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली होती.

त्याच्या बरगड्यांना आणि स्नायूंना गंभीर दुखापत झाली होती, दुखापतीमुळे बिग बींना शूटिंग मध्येच सोडून मुंबईला परतावे लागले. त्यांनतर ते घरीच आराम करत होते. त्याचे चाहते त्याच्या प्रकृतीसाठी चितींत होते.

काही दिवसांपुर्वी त्यांनी फोटो पोस्ट करत ते लवकरच कामावर परतणार असं सांगतिलं होतं. आता ते पुन्हा कामावर परतले आहेत. दुखापती आणि वेदनांदरम्यान पुन्हा एकदा त्यांच्या आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या शूटिंगला त्यांनी सुरुवात केली आहे. अमिताभ बच्चन अजूनही पूर्णपणे बरे झाले नसले तरी त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.

नेहमी प्रमाणे बिग बींनी त्यांच्या आरोग्यासंबंधी माहिती ब्लॉगद्वारे दिली आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी लिहिले आहे, 'शरीराला दुखापत झाली असूनही... बरे होण्याची इच्छा आणि प्रयत्न असले पाहिजेत. माझ्या प्रियजनांच्या प्रेम, काळजी आणि हितचिंतकांसाठी पुन्हा पुन्हा धन्यवाद, ज्यांच्यामुळे हा प्रयत्न शक्य झाला आहे.

बिग बींनी पुढे लिहिले, 'कामाचं शेड्यूल संपलं आहे आणि चार्ट पुन्हा भरण्यास सुरुवात झाली आहे.. 'मोई'च्या आनंदासाठी.. कारण कामापेक्षा चांगला टाईमपास कोणताच असूच शकत नाही. होय, बरगडी आणि पायाचे बोट दुखत आहेत, पण हे दुखणं कमी व्हायला हवं आणि त्यावर काहीतरी उपाय शोधावाच लागेल.

याच ब्लॉगद्वारे बिग बींनी चाहत्यांना हेल्थ अपडेटही दिली आहे. त्यांनी सांगितले होते की त्यांना 'खूप वेदना आहे', त्यामुळे रात्री उशिरा डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्यांनी लिहिले की, 'बरगडीमध्ये तीव्र वेदना सुरू झाल्या, पण अचानक पायाच्या बोटात इतकं दुखायला लागले की मी बरगडीकडे लक्ष द्यायला विसरलो.'

'प्रोजेक्ट के' या सिनेमाचं बजेट ५०० करोडच्या आसपास असुन नुकतच सिनेमाचे पोस्टर्स रिलीज झाले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साउथ स्टार प्रभास आणि दीपिका पदूकोण असणार आहे. हा चित्रपट एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT