Amitabh Bachchan in dilemma over attending IND vs AUS World Cup 2023 final SAKAL
मनोरंजन

Ind vs Aus CWC Final: "मी जाऊ की नको?" क्रिकेट वर्ल्डकप फायनल बघण्यासाठी अमिताभ संभ्रमात, लोकं म्हणतात...

अमिताभ बच्चन क्रिकेट वर्ल्डकप पाहायला जावं की जाऊ नये? या संभ्रमात आहेत

Devendra Jadhav

अमिताभ बच्चन हे भारतीय मनोरंजन विश्वातील महानायक म्हणुन ओळखले जातात. अमिताभ यांना आपण गेली अनेक वर्ष विविध सिनेमांंमधून अभिनय करताना पाहिलंय. अमिताभ यांचे सिनेमे पाहणं रसिकांसाठी पर्वणी असते.

सध्या अमिताभ बच्चन एका कारणामुळे चांगलेच चर्चेत आहेत ते म्हणजे क्रिकेट वर्ल्डकपमुळे. येत्या रविवारी क्रिकेट वर्ल्डकप 2023 ची फायनल रंगणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना रंगणार आहे. त्यानिमित्ताने अमिताभ यांनी एक पोस्ट लिहीलीय ती चर्चेत आहे.

(Amitabh Bachchan in dilemma over attending IND vs AUS World Cup 2023 final)

मी वर्ल्डकप पाहायला जाऊ की नको? अमिताभ बच्चन असं का म्हणाले?

अमिताभ यांनी त्यांच्या X हँडलवर एक ट्विट केलंय ज्यात त्यांनी, मी आता विचार करतोय जाऊ की नको? असा प्रश्न विचारलाय.

अमिताभ असं का म्हणाले यामागे एक खास किस्सा आहे की, काही दिवसांपुर्वी अमिताभ यांनी ट्विट केलं होतं की, जेव्हा ते सामना पाहत नाही तेव्हा भारतीय क्रिकेट संघ नेहमीच जिंकतो.

त्यामुळे या ट्विटखाली बिग बींना लोकांच्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. काय म्हणाले लोकं बघूया.

लोकांनी अमिताभ यांना सामना न पाहण्याचा दिला सल्ला

अमिताभ यांनी ट्विट केल्यावर नेटिझन्सनी त्यांना रविवारी आगामी ICC विश्वचषक अंतिम सामना न पाहण्याचा इशारा दिला.

एका यूजरने लिहिले की, 'सर फायनल मॅच पाहू नका.' दुसऱ्याने लिहिले, 'बच्चन सर, घरातच राहा.' दुसर्‍या युजरने हिंदीत कमेंट केली की, 'वर्ल्ड कप फायनलच्या वेळी अमिताभ यांना एका दुर्गम बेटावर लॉक करण्याची काहीतरी व्यवस्था करूया.'

युजर्सनी गंमतीशीर कमेंट करत अमिताभ यांना वर्ल्डकप फायनल न पाहण्याचा सल्ला दिलाय. अशाप्रकारे आलेल्या प्रतिक्रिया बघत अमिताभ वर्ल्डकप पाहायला जावं की जाऊ नये या संभ्रमात आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनल रंगणार

भारताने न्युझीलंडला सेमीफायनलमध्ये हरवुन वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मजल मारली. तर काल साऊथ आफ्रिकाला हरवत ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये आलीय.

त्यामुळे रविवारी १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्ल्डकपचा फायनल मुकाबला रंगणार आहे. १९८३, २०११ नंतर भारत यंदा तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT