Amitabh Bachchan New post esakal
मनोरंजन

Amitabh Bachchan Post : अमिताभ यांची 'ती' पोस्ट राहुल गांधींसाठी तर नाही ना? 'बिग बीं' नी जशास तसं उत्तर दिल्याची होतेय चर्चा!

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे ऐश्वर्या रॉय आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Post) यांच्यावर बोलताना दिसत आहेत.

युगंधर ताजणे

Amitabh Bachchan Post : कॉग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या त्यांच्या भारत जोडो यात्रेमुळे चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या (Rahul Gandhi News) या यात्रेची नागरिकांना उत्सुकता आहे. त्यांनी वाराणसीमधील एका रॅलीमध्ये केलेलं वक्तव्य आणि आता बिग बी यांनी केलेली पोस्ट यांच्यावरुन नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे.

राहुल गांधी यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची सून (Big B Amitabh Bachchan) ऐश्वर्या रॉय यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं त्यामुळे ते सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कमेंटचा विषय झाल्याचे दिसून आले. त्यावक आता बिग यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर केलेली पोस्ट (Bollywood Latest news) नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. बिग बी यांनी आपल्या पोस्टमध्ये कुणाचे नाव घेतलेलं नाही, पण नेटकऱ्यांनी ती पोस्ट राहुल गांधींना दिलेलं उत्तर आहे असं म्हटलं आहे.

बिग बी यांनी राहुल गांधींना जशास तसं उत्तर दिलं असून त्यांनी राहुल गांधींचे तोंड बंद केले आहे. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी बिग बी यांच्या त्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमिताभ यांनी त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी माझ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून शाररिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले आहे. वर्कआऊटची ही वेळ आहे. शरीराची अन् मेंदूची कार्यक्षमता वाढविण्याचा हा प्रयत्न असून बाकी सगळे वाट पाहत आहेत. असे अमिताभ यांनी म्हटले आहे.

यानंतर लिहिलाय ब्लॉग...

याशिवाय अमिताभ यांनी स्वतंत्र ब्लॉग देखील लिहिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, बऱ्याच दिवसांपासून प्रोफेशनल जर्नीमध्ये राहिलो आहे. मोठ्या काळापासून सारखे काम सुरु आहे. मात्र आपला हा प्रवास सुरुच राहतो. तो प्रवास कमी व्हावा असे आपल्याला वाटू नये यासाठी सतत कार्यशील राहणे गरजेचे आहे. कुणीही आपल्याला काहीही सांगू आपली लढाई ही आपल्याला लढावी लागेल.

आपण प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे. काहीजण आपल्याविषयी बोलतील त्या शुभचिंतकांच्या समर्थनासह आपण आपली वाटचाल करत राहणे जास्त महत्वाचे आहे. असेही बिग बी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. या सगळ्यात नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांनी राहुल गांधींना उत्तर दिल्याचे म्हटले असून मात्र यात अमिताभ यांच्याकडून अधिकृतपणे कोणतीही पोस्ट शेयर केली नसल्याचे म्हटले आहे. न्युज १८ ने याबाबत वृत्त दिले आहे.

राहुल गांधी काय म्हणाले होते...

त्या रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी बॉलीवूडवर टिप्पणी केली होती. त्यांनी आपल्या भाषणात अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या रॉयचे नाव घेतले होते. राम मंदिराच्या उद्घघाटनाला मोदीजी हे अमिताभ यांना बोलावतील. दुसऱ्या रॅलीमध्ये त्यांनी म्हटले होते की, ऐश्वर्या रॉय डान्स करेल आणि बच्चन साहेब बल्ले बल्ले करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT